Advertisement
नागपूर : रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि मुलींची छेड काढणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली आहे. पांडुरंग दांडेकर असे आरोपीचे नाव असून तो सेवानिवृत्त कर्मचारी आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून आरोपी रस्त्यावरून चालणाऱ्या मुली आणि महिलांची छेड काढत असल्याची माहिती मिळाली आहे. आज पुन्हा तसेच काही घडले सायकलवरून जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला थांबवून आरोपी दांडेकर याने तिला जबरदस्तीने आपल्या दुचाकीवर बसविले आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
कोणताही मोठा अनुचित प्रकार घडण्यापूर्वी पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत आरोपी दांडेकर याला बेड्या ठोकल्या. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पोलीस अधिक तपास करत आहेत.