नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरूवार (2) रोजी शोध पथकाने 68 प्रकरणांची नोंद करून 45,500/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 14 प्रकरणांची नोंद करून 5,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 4 प्रकरणांची नोंद करून 1,600/- रुपयांची वसुली करण्यात आली.
वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 21 प्रकरणांची नोंद करून 20,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. चिकन सेंटर, मटन विक्रेता, यांनी त्याचा कचरा रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली.
वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2,000/ रुपयांची वसुली करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी बांधकामाचा मलबा / टाकवू कचरा टाकणे साठवणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2,000/ रुपयांची वसुली करण्यात आली.
उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून 10,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने हनुमान नगर झोन अंतर्गत मे. श्री बालाजी गारमेंटस् यांनी मनपा यांच्या विरूध्द विनापरवानगी विद्युत खांबांवर जाहिरातीचे बॅनर लावल्याप्रकरणी रु. 5,000/- चे दंड वसुल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत श्री. सतिश मेश्राम यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. सुधांशु स्वीट्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 3 प्रकरणांची नोंद करून रू. 15,000/- दंड वसूल केला.