वाडी– वाडी पोलिसांच्या गस्ती पथकाच्या सतर्कतेमुळे 2 जुलाई ला एका आकस्मिक कार्यवाहीत 2 व्यक्ती कडून अवैध मद्यासाठा व वहन करणारी कार ताब्यात घेण्यास यश आले.
वाडी पोलिसांनी जारी केलेल्या वार्ता पत्रानुसार खड्गाव मार्गावरील लावा चौकात वाडी पोलिसांचे गस्ती पथक 23 वाजताच्या सुमारास गस्त घालीत असताना त्यांना एक संशयास्पद कार दिसून आली.या कारची तपासणी केली असता त्यात मद्य साठा आढळून आला.
या कार मध्ये उपस्थित दोघांना विचारपूस केली असता नियमबाह्य पद्धतीने ही दारू विक्री साठी वहन करीत असल्याचे स्पष्ट झाले.पोलिसांनी कार सह दोघांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ला आणले.
आरोपी दशरथ मनोहरे वय 35 रा.माहुरझरी,व सूरज वानखेडे,वय 31 रा.टेकडी वाडी यांचेवर कलम 65 इ,66 ब महाराष्ट्र दारू कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यांच्या कडून देशी दारू भिंगरी च्या 7 पेट्या किंमत 20160 रु,व मारुती कार क्र.5893 किंमत 90 हजार असा ऐकून 1लाख 10 हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.ही यशस्वी कार्यवाही पोलीस उपायुक्त नरूल हसन,सपोआ.कार्यकर्ते,पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात व दुय्यम पोलीस निरीक्षक भारत कऱ्हाडे,पोउनी साजिद अहमद,पो.ह. सुनील मस्के,प्रदीप, सतीश,इशवर,हेमराज,प्रमोद यांच्या पथकाने केली.पो.ह.सुनील मस्के पुढील तपास करीत आहे.