नागपूर,ता : नागपूर शहरातील प्रतिभावंत खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंकरिता उडान खेल प्रोत्साहन योजने’च्या माध्यमातून मनपाद्वारे 74 खेळाडूंना 57लक्ष 89 हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात आले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकारातून ‘उडान खेल प्रोत्साहन योजना सुरु झाली आहे. या माध्यमातून मनपाद्वारे खेळाडूंना आर्थिक सहाय्य मिळण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वी योजनेचा जास्तीत जास्त खेळाडूंना लाभ मिळावा याकरिता मनपाद्वारे शहरातील सर्व क्रीडा संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती.
‘उडान खेल प्रोत्साहन योजने’चे अर्ज करण्यासाठी www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरून मनपातर्फे ऑनलाईन सह ऑफलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार 74 खेळाडू विविध प्रोत्साहन पुरस्कारासाठी पात्र ठरले. महापालिकातर्फे या खेळाडूंना आता आर्थिक सहाय्य मिळाले आहे.
मागील तीन वर्षांच्या कालावधीत नागपूर शहरातील आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त 10 खेळाडूंना प्रत्येकी 2 लक्ष रुपये प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले. यात नाकाडे शाश्रुती विनायक (ट्रायथलॉन), मालविका प्रबोध बन्सोड (बॅडमिंटन), अल्फिया तरन्नुम पठाण (बॉक्सिंग), स्नेहल सुनील जोशी, संजान सुनील जोशी (ट्रायथ्लॉन), मृदुल विकाल डेहनकर, दिव्या जितेंद्र देशमुख, रोनक भारत साधवानी(सर्व बुद्धिबळ),जेनीफर वर्गिस (टेबल टेनिस), ओजस प्रवीण देवतळे (आर्चरी) यांचा समावेश आहे.
आंतराष्ट्रीय स्पर्धात सहभाग असलेल्या दोन खेळाडूंना प्रत्येकी 1 लक्ष रुपये प्रोत्साहन पुरस्कार दिले जाणार आहे. यात मृणाली प्रकाश पांडे ( बुद्धीबळ), सिया देवधर (बास्केटबॉल) यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त 15 खेळाडूंना प्रत्येकी 1लक्ष रुपये देण्यात आले. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झालेल्या 9 खेळाडूंना प्रत्येकी 21 हजार रुपये प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले. तसेच राष्ट्रीय अजिंक्य स्पर्धा पदक प्राप्त 38 खेळाडूंना प्रत्येकी 50 हजार रुपये प्रोत्साहन पुरस्कार देण्यात आले. असे एकून 57लक्ष 89 हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम प्रदान करण्यात आले.
या स्पर्धांचा समावेश
ऑलिम्पिक स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, शालेय आशियाई/जागतिक स्पर्धा, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, एशियन गेम्स, युथ ऑलिम्पिक, पॅरा एशियन स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, ज्युनिअर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप, वर्ल्ड कप, राष्ट्रीय स्पर्धा (नॅशनल गेम्स), ऑलिम्पिक क्रीडा प्रकारातील राष्ट्रीय वरिष्ठ व कनिष्ठ स्पर्धाचा समावेश आहे.
उडान खेल योजना पुरस्कार प्राप्त विजेत्यांची यादी
आंतराष्ट्रीय पदक प्राप्त
खेळाडूंचे नाव क्रीडा प्रकार
नाकाडे शाश्रुती विनायक ट्रायथलॉन
मालविका प्रबोध बन्सोड बॅडमिंटन
अल्फिया तरन्नुम पठाण बॉक्सिंग
स्नेहल सुनील जोशी ट्रायथलॉन
संजना सुनील जोशी ट्रायथलॉन
मृदुल विलास डेहनकर बुद्धिबळ
दिव्या जितेंद्र देशमुख बुद्धिबळ
रौनक भारत साधवानी बुद्धिबळ
जेनेफ थॉमस वर्गिस टेबल टेनिस
ओजस प्रविण देवतळे आर्चरी
आंतरराष्ट्रीय स्पर्धा सहभाग
खेळाडूंचे नाव क्रीडा प्रकार
मृनाली प्रकाश पांडे बुद्धिबळ
सिया देवधर बास्केटबॉल
राष्ट्रीय स्पर्धा पदक प्राप्त
खेळाडूंचे नाव क्रीडा प्रकार
मेहबुब इलाही अंसारी सिकई मार्शल आर्ट
छकुली सेलोकर योगासन
आस्था रविंद्र गायकी सिकई मार्शल आर्ट
सृष्टी दीपक शेंडे योगासन
चुटे कल्याणी विलास योगासन
वंजारी शुभम गौतम योगासन
चुटे हर्षल विलास योगासन
श्रीरामे वैभव वामन योगासन
अमन मजहर खान सिकई मार्शल आर्ट
सानिया देवसिंग चव्हाण सिकई मार्शल आर्ट
अभिषेक प्रमोद सेलोकर सॉफ्टबॉल
प्रथमेश राजेंद्र वाघ सॉफ्टबॉल
चेतन दीपक महाडिक सॉफ्टबॉल
रोहन रवी गुरबाणी बॅडमिंटन
राजेश मधुकर भट सॉफ्टबॉल
राष्ट्रीय स्पर्धा सहभाग
खेळाडूंचे नाव क्रीडा प्रकार
शाहनवाज खान सेपक टकरा
प्रांजली विनोद सुरदुसे मिनी गोल्फ
स्वयंम रविंद्र गायकी सिकई मार्शल आर्ट
अनिशा प्रकाश धुळधुळे सॉफ्टबॉल
निधी विष्णुजी खाम्बलकर सॉफ्टबॉल
पायल मारोती साखरे मिनी गोल्फ
ईशिका ईश्वर हनवंत मिनी गोल्फ
पार्थ अजय हिवरकर मिनी गोल्फ
आनंद बाबुलाल यादव सिकई मार्शल आर्ट
राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा पदक प्राप्त
अल्तमश पाशा सेपक टकरा
मृणाली मोहन बानाईत योगासन
प्राची राजु गोडबोले ॲथलेटिक्स
प्राजक्ता विलास गोडबोले ॲथलेटिक्स
रिया राजेश दोहतरे ॲथलेटिक्स
तन्वी सुखदेव धुर्वे वॉटर पोलो
अवनी अमितसिंह राठौर ॲक्रोबेटिक जिन्मॅस्टिक
शर्वरी विश्वास गौसेवाडे तलवारबाजी
ढगे वैभव विलास नेटबॉल
पखाले शवरी राजेश रायफल शुटिंग
चिटणीस आदी सुधीर टेबल टेनिस
झाडे जिज्ञासा जीवन रिदमिंग जिन्मॅस्टिक
प्रेरणा याद शुटिंग पिस्टल
भव्यश्री विश्वेश्वर महल्ले ॲथलेटिक्स
मोढे काजल संजय कबड्डी
अल्फिया सरवार खान ॲक्रोबेटिक जिन्मॅस्टिक
श्रेयस विनोद बहादुरे जलतरण
राधिका तेजसिंग जाधव कबड्डी
हर्षदा दमकुंडवार तलवारबाजी
तरारे निधी विनोद ॲथलेटिक्स
सुनिल भास्कर पांडे आटयापाटया
सेजल भुतडा लॉन टेनिस
पृथ्वीराज शेळके तायकांडो
खनक जैन जिम्नॅस्टीक
अमर गिरीधर साखरे खो-खो
क्रिषा सोनी बॅडमिंटन
अंजल अरविंद मडावी ॲथलेटीक्स
यश अनिल गुल्हाने स्विमिंग
मिहिरा विक्रांत धोटे बास्केटबॉल
इशिका महेंद्र मोटघरे रग्बी
निल हिंगे आर्चरी
उर्वशी सनेश्वर सॉफ्ट बॉल
जान्हवी हिरुडकर ॲथलेटीक्स
अनन्या नायडू रायफल शुटिंग
गुंजन मंत्री बॉस्केट बॉल
श्रुती जोशी तलवारबाजी