प्रवाश्यांना करीत आहे आकर्षित
नागपूर : महा मेट्रोने आझादीचा अमृत महातोसवानिमित्य सातत्याने उपक्रम राबवत असून एका नाविन्यपूर्ण कार्यक्रमाच्या अंतर्गत महा मेट्रोने संपूर्ण मेट्रो ट्रेनला आझादी का अमृत महोत्सव @७५ रॅपिंग केले आहे. हे अनोखे आवरण मेट्रो प्रवाश्यांना आकर्षित करीत आहे.
महा मेट्रो ट्रेनला केलेले रॅपिंग स्वातंत्र्य लढ्याची आठवण करून देते. या सारखे उपक्रम सातत्याने होणे आवश्यक असल्याचे मत मेट्रो प्रवासी श्री शशिकांत देशमुख यांनी केले. तर या सारख्या उपक्रमांनी सर्व सामान्य नागरिकांमध्ये देशप्रेमाची ज्योत पल्लवित होत असल्याचे मत श्रीमती आशा पाटील यांनी व्यक्त केले.
या संपूर्ण वर्षात महा मेट्रोने आजादी का अमृत महोत्सवानिमित्य अनेक उपक्रम राबविले असून झिरो माईल फिडम पार्क मेट्रो स्टेशन परिसरातील ४०,००० चौरस फूट क्षेत्रा मध्ये फ्रीडम पार्क तयार केला आहे. शिवाय त्या मेट्रो स्थाकनचे नाव देखील झिरो माईल फ्रिडम पार्क मेट्रो स्टेशन ठेवले आहे. अतिशय सुंदर असे हे पार्क शहरी विकासाचा एक उत्तम उदाहरण आहे. या ठिकाणी हेरिटेज वॉल, वॉर ट्रॉफी-टी 55 बॅटल टँक” ठेवण्यात आली आहे.
या शिवाय मेट्रो ट्रेन मध्ये आजादी का अमृत महोत्सवाचे रेकॉर्डेड विडियो चित्रफीत लावण्यात आली आहे. तसेच सर्व सामान्यांचा देखील या उपक्रमात सहभाग व्हावा या करीत विविध उपक्रम राबवले आहेत. त्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन केले ज्यामध्ये बालगीत आणि लोरी लेखान मध्ये अनेक शाळांनी व विध्यार्थ्यानी सहभाग नोंदविला .महा मेट्रो तर्फे देशभक्ती पर कविता व गीत वाचनाचा कार्यक्रम देखील राबवला गेला. याशिवाय मेट्रो भवन व मेट्रो स्टेशनवर आजादी का अमृत महोत्सवा संबंधी फलक लावण्यात आले आहे.
२ ऑक्टोबर गांधी जयंती च्या सुमारास महा मेट्रोने ट्रेन मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे आवडते भजन `वैष्णव जन तो तेणे कहिये’ ची धून देखील वाजवली होती. आझादी का अमृत महोत्सव निमित्त महा मेट्रो तर्फे विविध कार्यक्रमांची मालिका सुरूच राहणार असून येत्या काळात आणखी काही कार्यक्रम आयोजित होणार आहे.