रामनगर जलकुंभक्षेत्रातील (धरमपेठ झोन) भागांचा पाणीपुरवठा राहणार शुक्रवारी बाधित
नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी राम नगर जलकुंभाच्या ७००मिमी व्यासाच्या बटरफ्लाय व्हॉल्वच्या दुरुस्तीसाठी ८ तासांचे शटडाऊन १७ जुलै शुक्रवार रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान घेण्याचे ठरविले आहे.
यामुळे पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग: गोकुळपेठ, वाल्मिकी नगर, टिळक नगर, राम नगर, मरारटोली, तेलंगखेडी, P&T कॉलोनी, भरत नगर, हिंदुस्तान कॉलोनी, संजय नगर, अंबाझरी लेआऊट, समता लेआऊट,यशवंत नगर, वर्मा लेआऊट, अंबाझरी टेकडी, सुदाम नगरी, जय नगर, पांढराबोडी
या शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे ही पाणीपुरवठा शक्य होणार नसल्याने मनपा व OCWने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800 266 9899.