Advertisement
कामठी :- तंजीम खुद्दामे नौशाही कामठीच्या वतीने हजरतबाबा अब्दुल्ला शाह नौशाही कादरी उर्स निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराचा उद्घाटन दर्गा अध्यक्ष आबीद ताजी यांचे हस्ते व इकबाल ताजी यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या शिबिरात 83 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या रक्तदानासाठी मेयो हॉस्पिटल नागपूर च्या चमूने सहकार्य केले त्यात चेतन मेश्राम, वंदना भगत,सिराज भाटी, तौकीक अखतर, घनश्याम चकोले,रकीब अहमद,रमजान खान,मो. वशीम अजमेरी,शाबीर खान, शहबाज अहमद,अनिस शेख,सादिक अमीन कामरान जाफरी,मुकेश चकोले, पंकज नार्षेद्रावर, मनोज ढोले,कश्यप,अनिल गंडाईत, अंकुश पुरी,लीलाधर दवंडे इत्यादीची प्रामुख्याने उपस्थिती होती.
संदीप कांबळे कामठी