नागपूर: कोरडी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या कवठा मसाळा येथील छदानी प्लॉस्टीकच्या कंपनीतून लाखोंची चोरी करणाऱ्या नऊ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून चोरी गेलेला एकूण १८ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. विशाल कैलाश विरवानी यांनी या घटनेसंदर्भात फिर्याद दिली.
विशाल याचे त्याच्या मामाचे फॅक्टरीसंदर्भात काही भांडण झाले होते. त्यामुळे ही कंपनी गेल्या वर्षभरापासून बंद होती. चोरटयांनी याचाच फायदा घेत कंपनीत असलेल्या प्लॉस्टीकच्या वस्तूंसह इतर वस्तूंची चोरी केली.
कूदरत खान वल्द ईस्माइल खान (वय ५५), मो. ईकबाल मो. ईब्राहिम (वय ३५ वर्ष ), सलीम वल्द मो. ईस्माइल ( वय ४२ वर्षे ),अरबाज उर्फ शाहरूख अयूब कादरी ( वय २५ वर्षे ),जूनैद जावेद अंसारी (वय ३० वर्षे ),रियाज अहमद अंसारी (वय ४२ वर्षे),वलीद जावेद अंसारी (वय २४ वर्षे),घनश्याम परसराम कटरे (वय ४२ वर्षे ),रितेश भागवत मेश्राम (वय ३८ वर्षे ) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. हे सर्व आरोपी नागपुरातील रहिवासी असून त्यांना पोलिसांनी अटक केली. चौकशीदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून कंपनीतून चोरी गेलेला १८ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कोरडी पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.