नागपूर : मोदी सरकारला सत्तेत येऊन 9 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून अर्थव्यवस्थेपासून बेरोजगारीपर्यंत 9 प्रश्न विचारण्यात आले आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी नागपूरच्या प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेत पत्रकारांशी संवाद साधला.
अर्थव्यवस्था , भ्रष्टाचार / मित्रवाद, चीन आणि राष्ट्रीय सुरक्षा , सामाजिक सलोखा ,सामाजिक न्याय, घटनात्मक संस्था, घटनात्मक संस्था, कोरोना गैरव्यवस्थान या मुद्द्यांना अनुसरून काँग्रेसने मोदी सरकारला ९ प्रश्न विचारले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रश्नांचे उत्तर देणार का ? असा प्रश्न गौरव वल्लभ यांनी उपस्थित केला.
राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. शिंदे गटातील आमदारांनी 50 कोटी रूपये घेऊन बंड केले असा आरोप विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. गौरव वल्लभ यांनीही शिंदे आणि फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. महाराष्ट्रातील सरकार हे जनतेने निवडून दिलेले सरकार नसून ५० खोक्यांचे सरकार आहे, असल्याचा घाणघातही गौरव वल्लभ यांनी केला.
या पत्रकार परिषदेला कॉग्रेस आमदार विकास ठाकरे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विशाल मुत्तेमवार , कमलेश समर्थ ( महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेक्रेटरी ) , संदेश सिंगलकर ( महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेक्रेटरी ) , अशोक धवड यांच्यासह काँग्रेसने पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.