नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केला आहे. निकालापूर्वी राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी त्रकार परिषद घेत निकालाची माहिती दिली आहे. यंदाच्या निकालात कोकण अन् पुणे विभागाने बाजी मारली आहे.
राज्यात कोकण विभागातील ९६.०१ टक्के असे सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर मुंबई विभागाचा ८८.१३ टक्के असा सर्वात कमी आहे. पुणे विभागातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९३.३४ टक्के इतकी आहे. तर नागपूर विभागाची टक्केवारी ९०.३५ टक्के इतकी असून यंदा बारावीच्या निकालाची टक्केवारी घटल्याचे चित्र आहे.
नागपूर विभागात एकूण १,५२,१२१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. एकूण १,३७,४५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्यापैकी ६७,४४९ मुले तर ७०,००६ मुली उत्तीर्ण झाल्या. नागपूर विभागातील उत्तीर्णतेची एकूण टक्केवारी ९०. ३५ इतकी आहे. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८७.६३ आहे, तर मुलींची टक्केवारी ९३.१४ आहे.
तर नागपूर जिल्ह्यात एकूण ६१,०९२ विद्यार्थी – ३०,५७५ मुले आणि ३०,५१७ मुली – बारावीच्या परीक्षेला बसले होते. एकूण ५४,८७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ८९. ८१ आहे. २६,६६७ मुले ८७.२१ टक्के आणि २८,२०३ मुली ९२.४१ टक्के घेऊन उत्तीर्ण झाल्या.
नागपूर जिल्ह्यातील विज्ञान शाखेत १५,०२५ मुले आणि १६,५८४ मुली असे एकूण ३१,६०९ विद्यार्थी बसले. यातील एकूण ३०,३७७ विद्यार्थी – १४,४३३ मुले आणि १५,९४४ मुली – उत्तीर्ण झाले.
नागपूर जिल्ह्यातील कला शाखेत एकूण १३,५९४ विद्यार्थी – ६४५० मुले आणि ७१४४ मुली – बसले. यातून एकूण १०,७७० विद्यार्थी – ४७३८ मुले आणि ६०३२ मुली उत्तीर्ण.
नागपूर जिल्ह्यातील वाणिज्य शाखेत एकूण १२,८७० विद्यार्थी – ६७२२ मुले आणि ६१४८ मुली बसले. एकूण ११०८१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून मुलांची संख्या ५४४५ आणि मुली ५६३६ आहेत.
HSC व्यावसायिक अभ्यासक्रमात नागपूर जिल्ह्यातून एकूण २७१५ विद्यार्थी – २१०८ मुले आणि ६०७ मुलींनी परीक्षा दिली. एकूण २४२३ विद्यार्थी – १८५८ मुले आणि ५६५ मुली उत्तीर्ण झाले आहेत. तर तंत्रविज्ञान अभ्यासक्रमात नागपूर जिल्ह्यातून २७० मुले आणि ३४ मुली असे एकूण ३०४ विद्यार्थी बसले. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २१९ – १९३ मुले आणि २६ मुली आहे.
दरम्यान राज्य मंडळाच्या या परीक्षेसाठी. १४लाख २८ हजार १९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील १४ लाख १६ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तब्बल २.९७ टक्क्यांनी घट झाली आहे.
विभागनिहाय टक्केवारी –
पुणे ९३.३४ टक्के
नागपूर ९०.३५
औरंगाबाद ९१.८५
मुंबई ८८.१३
कोल्हापूर ९३.२८
अमरावती ९२.७५
नाशिक. ९१.६६
लातूर. ९०.३७
कोकण ९६.०१