Published On : Mon, Jan 13th, 2025
By Nagpur Today Nagpur News

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणाऱ्या 94 प्रकरणांची नोंद

उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. सोमवार (13) रोजी शोध पथकाने 94 प्रकरणांची नोंद करून 58,600/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 27 प्रकरणांची नोंद करून 10,800/- रुपयांची वसुली करण्यात आली.

व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200 रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 9 प्रकरणांची नोंद करून 3,600/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 23 प्रकरणांची नोंद करून 25,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी वाहने/जनावरे धुवून परिसर अस्वच्छ करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 1,000 रुपयांची वसुली करण्यात आली.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 20 प्रकरणांची नोंद करून 4,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून 10,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत श्रीमती. राजश्री रायबोले यांनी चेंबर तोडल्यामुळे त्यातिल सांडपाणी रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. धंतोली झोन अंतर्गत मे. श्री निवास रेसेडेन्सी यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. अभिषेक किराणा यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. उपद्रव शोध पथकाने 3 प्रकरणांची नोंद करून रू. 20,000/- दंड वसूल केला.

Advertisement