सरकारने ने केली थट्टा- कैलास फाटे
खामगांव (बुलढाणा)। दुबार पेरणीसाठी शासनाने हेक्टरी 1500 रु. ची तोकड़ी मदत केली असून याचा निषेध म्हणून आज स्वाभिमानाने शेतकरी संघटनेच्या वतीने पहुरजिरा येथे “दगड पेरो” आंदोलन करण्यात आले. शासनाने देवू केलीली हि मदत म्हणजे एकप्रकारे शेतकऱ्यांच्या क्रूर थट्टास असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी स्वाभिमानी जिलाध्य्क्ष कैलास फाटे ने व्यक्त केली आहे.
पावसाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरीणीचे संकट उभे ठाकले आहे. शुरुवातीला बरसलेल्या पावसाने सलग एक महिन्याची दांडी मारल्याने शेतकरी अडचणीत सापडला असून या पार्श्वभूमिवर राज्य शासनाने नुकतीच दुबार पेरणीसाठी हेक्टरी 1500 रु. ची मदत देण्यात जाहीर केले आहे. म्हणजे एकरी 600 रु. दुबार पेरणीसाठी मदत मिळणार आहे. प्रत्काक्षात एक एकर शेत पेरणीचा खर्च 5000 से 7000 रु. इतका आहे.
सरकारच्या अशा भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून याचा निषेध म्हणून आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने “दगड पेरो” हे अभिनव आंदोलन करण्यात आले. तसेच सरकारने दुबार पेरणीसाठी ठोस मद्त द्यावी अशी मांगणीही यावेळी केली. सदर आंदोलनात स्वभिमानीचे प्रकाश पाटील, मासूम शहा, शेषराव जवंजाळ, अनिल पाटील, शे. सलीम शे. ज्ञानदेव उचाडे सह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.