Published On : Sun, Dec 15th, 2019

कामठी क्षेत्राच्या विकासासाठी सतत कार्यरत राहणार : चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement

नागरी जाहीर सत्कार कार्यक्रम

नागपूर: कामठी विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सतत कार्यरत राहणार असून या विधानसभा क्षेत्राला सर्वांगसुंदर बनविण्याचे आपले स्वप्न आपण पूर्ण करू. जनतेच्या सहकार्याने हे सर्व सहज शक्य होणार असल्याचे प्रतिपादन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

Gold Rate
Thursday 16 Jan. 2025
Gold 24 KT 79,000 /-
Gold 22 KT 73,500 /-
Silver / Kg 92,100 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कामठी येथे गंज के बालाजी मंदिराच्या सभागृहात बावनकुळे यांचा शुक्रवारी रात्री जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तेजराज बाबजी महाराज, श्रीकृष्ण देवनाथ बाबा, माजी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आ. टेकचंद सावरकर, उद्योगपती अजय अग्रवाल, प्रा. मनीष वाजपेयी, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. संदीप कश्यप, रणजित सफेलकर, हरिशंकर गुप्ता, खैरीचे सरपंच मोरेश्वर कापसे, मोहन माकडे, पंकज साबरे, मंगला कारमोरे, डॉ. महेश महाजन, लालसिंग यादव, उज्ज्वल रायबोले, नगरसेविका संध्या रायबोले आदी उपस्थित होते.

माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. बावनकुळे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पुढे बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनामुळे आपण 27 वर्षे या मतदारसंघात जनतेची कामे करू शकलो आणि हा विधानसभा मतदारसंघ अधिक विकसित करण्याचा प्रयत्न केला. कोणताही जातीयवाद मनात न ठेवता आपण जनतेच्या समस्या निकाली लावण्याचा प्रयत्न केला. उर्वरित अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठ़ी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन ही कामे पूर्ण करू. या मतदारसंघातील जनतेने मला दिलेले सहकार्य यामुळे कामे करण्यासाठी मला ऊर्जा मिळाली. असेच प्रेम आणि उत्साह कायम राहण्यासाठी जनतेने सदैव माझ्या पाठीशी उभे राहावे असेही बावनकुळे यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र अग्रवाल यांनी केले तर संचालन मनीष वाजपेयी यांनी केले. आभार श्रीकांत शेंद्रे यांनी मानले. या कार्यक्रमाला कामठी आणि परिसरातील बावनकुळे यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement