– पीरिपाचे जयदीप कवाडेंचे पोलिस आयुक्तांना निवेदन
नागपूर. संत्रानगरीचे लोकप्रिय महापौर संदीप जोशी व त्यांच्या परिवारावर मंगळवारी मध्यरात्रीला अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला. या भ्याड हल्ल्याचा पीपल्स रिपब्लिक पार्टीतर्फे निषेध नोंदविण्यात आले. महापौरांवर भ्याड हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना त्वरित अटक करून मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत करावे, अशा मागणीचे निवेदन पीरिपातर्फे करण्यात आली.
बुधवारी पोलिस आयुक्तालयात पीरिपाचे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी डॉ. उपाध्याय यांनी आरोपींना लवरकच गजाआड करण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात पीपल्स रिपब्लिकन पार्टी युवक आघाडीचे महाराष्ट्र संघटक कपील लिंगायत, शहराध्यक्ष रोशन तेलरांधे, सचिव विपीन गाडगीलवार, महासचिव सतीश मोहोड, उपाध्यक्ष तुषार चिकाटे, दक्षिण-पश्चिम अध्यक्ष प्रणव हाडके, जितेंद्र वासवानी, पीयूष हलमारे, अभिलाष बोरकर, महेश बाबू, महेंद्र पावडे, आकाश कांबळे, डॉ. सौरभ मुन, स्वप्नील महल्ले आदिंची उपस्थिती होती.