मुंबई: केंद्रातील पॉवर आणि आर्थिक ताकद वापरुनही झारखंडच्या जनतेने भाजपला स्वीकारले नाही त्याबद्दल झारखंडच्या जनतेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी धन्यवाद दिले आहेत.
आज सिल्व्हर ओक या त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.
झारखंडसह, महाराष्ट्र मध्यप्रदेश, छत्तीसगड, राज्यस्थान या पाच राज्यातून भाजपा हद्दपार झाली आहे. झारखंड या राज्यात आदिवासी व गरीब लोकांची संख्या जास्त आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारची वापरली गेलेली पॉवर व आर्थिक ताकद न जुमानता इथल्या जनतेने भाजपाला नाकारले आहे असेही शरद पवार यांनी सांगितले.
आता अन्य राज्यांना या निकालामुळे एकत्रित सामना करायला एक विश्वास मिळाला आहे. आणि त्याचा वापर येत्या निवडणूकीत नक्कीच होणार आहे असेही शरद पवार म्हणाले.