नागपुर: प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष सुरू करून ह्या कक्षाला मुख्यमंत्री कार्यालयाशी जोडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या समारोपीय दिवशी आपल्या भाषणातून घोषणा केली.
सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.डॉ.नितीन राऊत यांनी ह्या संदर्भात ६ डिसेंम्बर २०१९ रोजी मुख्यमंत्र्यांना एक पत्राद्वारे विनंती केली होती.
महाविकास आघाडी सरकारने सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यविषयक प्रश्नांसंदर्भात उचललेले हे महत्वपूर्ण पाऊल आहे