Published On : Mon, Dec 23rd, 2019

‘बे एक बे’ स्पर्धेत तब्बल ७ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

Advertisement

नागपूर : मुलांमध्ये गणितशास्त्राची गोडी निर्माण व्हावी. डिजिटल कॅलकुलेटरच्या काळात मुलांना पाढे पाठ व्हावेत, एवढ्या साध्या उद्देशाने अग्रेसर फाउंडेशनने घेतलेल्या आंतरशालेय ‘बे एक बे’ या गणित स्पर्धेत उदंड प्रतिसाद मिळाला. शहारातील 35 शाळांमधून तब्बल ७ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.

मुलांची स्पर्धेची तयारी एवढी होती की, विजय खेचून आणण्यासाठी अनेकांचे मेंदू कॅलकुलेटर सारखे धावत होते. एकूण दोन गटात झालेली ही स्पर्धा एकाच वेळी तब्बल ७० स्वयंसेवकांच्या योगदानातून यशस्वी झाली. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना दोन ते विस पर्यंत पाढे मुखोद्गत असावे तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दोन ते तीस पर्यंतचे पाढे मुखोद्गत असणे अपेक्षित होते. विशेष म्हणजे स्पर्धेत विद्यार्थ्यांना ‘पंधरा साते किती’ किंवा ‘बारा आठे किती’ असे प्रश्न विचारण्यात आले. ज्यात विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला आणि स्पर्धेचा आनंदही लुटला.

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अग्रेसर फाऊंडेशनने 20 डिसेंबरला स्पर्धेची अंतिम फेरी घेतली. ज्यात उत्तीर्ण झालेल्या स्पर्धकांना गौरविण्यात आहे. निहाल नांनेटकर, ऋषिकेश जोशी, स्वप्नील तडस, श्रेयस जटलवार, जगदीश चिंतलवार, सचिन कश्यप, दीपक फुलबांधे, रक्षक ढोके, मोहित येंडे, अविनाश नारनवरे, वैष्णवी राऊत, अनुप सरोदे, अनिकेत ढबाले, महेश पाखमोडे, योगिता धोत्रे, दीपक तायवाडे, संकेत दुबे व मेघ गेडाम यांनी अग्रेसर फाउंडेशनच्या सदस्यांच्या मदतीने स्पर्धेची धुरा सांभाळली.

स्पर्धेचा निकाल
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी गणित दिनी घेण्यात आला. पहिल्या गटात सक्षम हातमोडे यांने प्रथम क्रमांक पटकावला तर विनीत तोंडारेला द्वितीय क्रमांक व कृतिका हरडेला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. दुसरया गटात वंश तितमारेने प्रथम क्रमांक पटकावला. गिरिश डाफला द्वितीय तर तुलसी देवांगणला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी केशवनगर शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद भाखरे उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे म्हणून मनी बीचे संचालक आशुतोष वक्रे, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राचे संचालक दीपक खिरवडकर, गिरडे कम्युनिकेशनचे बिपीन गिरडे, धनवटे महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेंद्र जिचकार व कॅलिबर नोवाचे राहुल राय उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्रांजली वानखेडे यांनी तर संचालन साक्षी राऊत, आयुष मुळे व कृतिका लाखे यांनी केले. आभार पियुष बोईनवार यांनी मानले. या स्पर्धेत सहभाग नोंदविलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी लावली.

Advertisement
Advertisement