दि. ०१ जानेवारी २०२० ला लता मंगेशकर हॉस्पिटल, सीताबर्डी येथे “आयुष हॉलिस्टिक मिलेनियम हेल्थ सेंटरचे” उद्घाटन करण्यात आले. प्रमुख अतिथी श्री स्वामी चैतन्यजी यांच्या शुभहस्ते व डॉ. संदीपजी श्रीखेडकर (अपेक्स मेंबर, आर्ट ऑफ लिव्हिंग, महाराष्ट्र) यांच्या अध्यक्षतेखाली या सेंटरचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला आयुष हॉलिस्टिक मिलेनियम हेल्थ सेंटरचे संरक्षक व व्ही.एस.पी.एम. अकॅडेमी ऑफ हायर एज्युकेशन नागपूरचे अध्यक्ष श्री. रणजीतबाबू देशमुख, सेंटरचे अध्यक्ष डॉ. गोविंद वर्मा, सचिव डॉ. विवेक हरकरे, डॉ. भाऊसाहेब भोगे, एन.के.पी. साळवे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. काजल मित्रा, डॉ. विलास धानोरकर, मुख्य प्रकल्प संचालक डॉ. हर्ष देशमुख, संयुक्त प्रकल्प संचालक डॉ. रिचा शर्मा, नर्सिंग सुप्रिंटेन्डेंट श्रीमती संघमित्रा पाटील, श्रीमती लीना भोवते व इतर मान्यवर उपस्थित होते.
“आयुष हॉलिस्टिक मिलेनियम हेल्थ सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या असाध्य रोगांचा उपचार आयुर्वेद, युनानी, हिमिजा, मास्क थेरपी, हेयर कन्सल्टन्सी, सु-जोक थेरपी, होमिओपॅथी, पेन मॅनेजमेंट, योगा व मेडीटेशनद्वारे करण्यात येईल. या प्रकल्पासाठी अनुभवी विशेषज्ञांची चमू आपल्या सेवा प्रदान करेल. सर्व पॅथीचे विशेषज्ञ दररोज दुपारी ३ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बाह्यरुग्ण विभागात उपस्थित राहतील”, अशी माहिती श्री. रणजीतबाबू देशमुख यांनी दिली.