नागपूर: तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून मंगळवारी (ता.२८) पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर विविध विभागांच्या कार्याचा आढावा घेत दररोज दुपारी ४ ते सायंकाळी ५ वाजताची वेळ नागरिकांच्या जनता दरबारासाठी त्यांनी जाहिर केला.
त्यानुसार बुधवारी (ता.२९) दुपारपासूनच छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील आयुक्त कक्षापुढे नागरिकांनी तोबा गर्दी केली. बुधवारी (ता.२९) दुपारी ४ ते सायंकाळी ५ या एक तासामध्ये आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनता दरबारात पहिल्याच दिवशी ४९ तक्रारी ऐकून घेतल्या. तक्रारी ऐकून संबंधित अधिका-यांना तात्काळ आवश्यक ते निर्देशही दिले.
यापूर्वी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी सकाळपासून विविध विभागांच्या कामाचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील काही विभागांची पाहणी करून आवश्यक ते निर्देश त्यांनी दिले.