कन्हान : – ढिवर समाज सेवा संघटना, कन्हान व्दारे ढिवर,भोई, कहार व तत्सम मच्छीमार समाजाच्या उन्नती करिता परि सरातील समाज बांधवांचा भव्य ढिवर समाज मेळावा थाटात संपन्न झाला. नुकताच डोणेकर सभागृह जेएन रोड कन्हान येथे ढिवर समाज सेवा संघटना, कन्हान तर्फे भव्य ढिवर समाज मेेळाव्या चे मा प्रा योगेश्वरजी दुधपचारे कार्याध्यक्ष चंद्रपुर जिल्हा भोई समाज सेवा संघ यांं च्या अध्यक्षेत, मा पी ए बावनकुळे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी वरूणकुमार सहारे तहसी लदार पारशिवनी, मा.आशिष जैस्वाल आमदार रामटेक, प्रमुख पाहुणे मा शरद डोणेकर, मा नितेश शेंडे, सौ करूणाताई आष्टणकर, सौ रंजनाताई पारशिवे, मा पंकेश बनसोड, मा बढे साहेब, मा लाल जी सहानी, मांढरे साहेब, महेंद्र पारसे आदी मान्यवर उपस्थित होते. विशेष आकर्षण म्हणजे समाजाची सांस्कृतिक दर्शन घडवणारी वेशभुषा, कोळी लोक नुत्य, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून ढिवर,भोई, कहार व तत्सम मच्छीमार समाजातील गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी, नवनिर्वाचित सदस्य व मान्यव रांचा सत्कार करण्यात आला. महिलां च्या हळदी-कुंकू कार्यक्रमा नंतर समाज प्रबोधनपर मान्यवरांचे विचार मंथन व मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे सचिव मनोज मेश्रा म यांनी केले. सुत्रसंचालन अरुण बावणे यांनी तर आभार प्रर्दशन अध्यक्ष सुतेश मारबते हयांनी केले. सहभोजनाने मेेळा व्याचा समारोप झाला.
मेळाव्यास परिस रातील समाज बांधवानी मोठया संंख्येने उपस्थित होऊन कार्यक्रमाचा लाभ घेत ला. कार्यक्रमाच्या आयोजनार्थ अध्यक्ष सुतेश (लिलाधर) मारबते, उपाध्यक्ष बाल चंद बोंद्रे, सचिव मनोज मेश्राम, अँड श्रीकांत मानकर, गितेश मोहणे, मोहन भोयर, शरद दुधपचारे, रामजी बावणे, अशोक मेश्राम, उमाप्रसाद कश्यप, रघुनाथ शेंडे, रेखाताई भोयर, कुंदाताई कांबळे, वैशाली मेश्राम, पायल मोहने, मोहिनी मेश्राम, वनिता मेश्राम सह ढिवर समाज सेवा संघटना कन्हानचे पदाधिका री, सदस्य व समाज बांधवानी सहकार्य केले.