कामठी : हिंगणघाट येथे प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून पेटविनाऱ्या नराधमास फाशी द्या अशी मागणी आमदार टेकचंद सावरकर यांच्या नेतृत्वातील भाजपा शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदनाद्वारे केली त्या बाबतचे निवेदन आज दुपारी तहसीलदार अरविंद हिंगे यांना सोपविले जळीत प्रकरणातील आरोपी ला फाशी द्यावी,खटला जलदगती न्यायालयात चालवावा,पिडीतेला मनोधैर्य योजनेचा लाभ द्यावा, वैद्यकीय उपचाराचा सर्व खर्च शासनाने द्यावा आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या, निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात जिल्हा परिषदेतील भाजपा विरोधी पक्ष नेते अनिल निधान, कपिल गायधने, भाजपा पदाधिकारी भाजप तालुकाध्यक्ष किशोर बेले, नरेश मोटघरे, भाजप शहराध्यक्ष संजय कनोजिया,फुलचंद आंबिलडूके, राहूल बोढारे, कांचन कुथे,अवंतिका महाजन,जि प सदस्य मोहन माकडे,प स सभापती उमेश रडके,रमेश चिकटे,पुष्पराज मेश्राम,संध्या रायबोले, सुषमा सिलाम,ज्योती चव्हाण,प्रितम लोहसारवा, पंकज वर्मा,विशाल चामट,रमेश वैद्य,मंगेश यादव,सुनील खानवानी,कैलास मलिक,विक्की बोंबले,अभिषेक कनोजे,दिनेश खेडकर,गेंदलाल कलसे,प्रमेन्द्र यादव, पृथ्वीराज दहाट, सचिन डांगे, विनोद वाठ यांच्यासह मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी काल परवा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्वरित सर्वेक्षण-पंचनामे करून शेतकऱ्यांना एकरी 25 हजार ची नुकसान भरपाई देण्याची मागणी करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावाचे निवेदन तहसीलदार अरविंद हिंगे यांना देण्यात आले