मुंबई : महाविकास आघाडीचे यवतमाळ विधानपरिषदचे शिवसेनेचे विजयी उमेदवार श्री दुष्यंत चतुर्वेदी यांना आज दि.०७ फेब्रुवारी, २०२० रोजी सभापती रामराजे निंबाळकर यांनी गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी उपसभापती ना.डॉ.नीलम गोऱ्हे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, वनमंत्री संजय राठोड, संसदीय मंत्री अनिल परब, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी स्थाई समिति अध्यक्ष नागपुर आभा चतुर्वेदी,शहर समन्वयक नितिन तिवारी, युवा सेना उपसचिव धरम मिश्रा, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत, उत्तमसिंह चव्हाण उपस्थित होते.
श्री दुष्यंत यांचे कॉमर्स विषयाची पदवी नागपूर विद्यापीठ येथून घेतली आहे. राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य देखील ते काम बघत आहेत तसेच लोकमान्य जन कल्याण शिक्षण, नागपूर संस्थचे विश्वस्त म्हणून काम उत्तम प्रकारे करत आले आहेत.
श्री दुष्यंत हे विविध सामाजिक कामाबाबत काम करत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात २८ शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे काम करण्यात त्याचा मोठा वाटा आहे. विदर्भ माथाडी कामगारसेनेचे त्यांनी अध्यक्ष म्हणून देखील काम केले आहे. हे एक क्रीडापटू असून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा मध्ये भाग घेतला असून ते महाराष्ट्र रायफल नियंत्रण मंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे.