रामटेक:- रस्ते वाहतु कित दिवसेंदिवस अपघातात वाढ होत असल्याने ही चिंतेची बाब राष्ट्राला गंभीर समस्या भेडसावत असून पुर्वी रोगराईने कुटुंबचे कुटुंब मृत्युमुखी पडाय चे यावर नवनवीन व आधुनिक औषधो पचाराने मात केली असून ती समस्याच नियंत्रणात आली.परंतू रस्त्यावरील अपघातात कमालीची वाढ झाली असून त्यावर उपाययोजना आवश्यक असल्या ने रस्ता सुरक्षा सप्ताहा अंतर्गत जनजागृ ती करण्यात येत आहे.
स्थानिक राष्र्टीय आदर्श विद्यालयात आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहा निमित्य आयोजित कार्यक्रमात मध्यमवर्गीय व उच्चवर्गीय लोक जास्तीत जास्त दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी करीत असून वाहनांची गर्दी वाढत अाहे. यामुले अपघात कार्यालयीन व शालेय वेळात होत असून लगबग व अनावधाने लोक मृत्युच्या दाढेत ओढल्या जातात असे मत परिवहन विभागाचे निरीक्षक चव्हाण यांनी व्यक्त केले.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रस्त्याच्या डाव्या बाजूने चिलणे, रस्ता ओलांडतांना काळजी घेणे. परिवहन विभागाचे नियम पाळणे यासह हेल्मेटचा वापर नियमित करणे, मद्य प्राशन करून वाहन न चालविणे, या विषयावर मार्गदर्शन करण्यांत आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक गायधने, तर सेवानिवृत्त कर्मचारी एन आर रामेलवार, परिवहन अधिकारी चव्हाण, उपमुख्याध्यापक पुरूषोंत्तम बेले, अनिल कोल्हे ,रंगराव पाटील ,सुनील सेलोकर ,कमलेश शहारे, मैंद, वाघाडे, खंडाईत, माकडे, सुनील हटवार, अशोक नागपुरे, संजीव दर्यापुरकर, जगदीश गुजरकर शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.