“महागड्या खाजगी वैद्यकीय सेवांमुळे सामान्य जनता भरडली जात आहे. आपल्या दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील आरोग्य विषयक समस्या लक्षात घेत वैद्यकीय उपचार सेवेपासून गरजू रुग्ण उपेक्षित राहू नये म्हणून लता मंगेशकर हॉस्पिटल, डिगडोह हिल्स, हिंगणा रोड, नागपूरतर्फे भव्य रोगनिदान व रुग्णभरती शिबिरांची मालिका सुरु करण्यात आली आहे. लता मंगेशकर हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रातील गरजू रुग्णांना काही सेवांवर नि:शुल्क व काही सेवांवर मोठ्या सवलतीच्या रुपात मदत करण्याची इच्छा आहे.
शासकीय योजनांच्या माध्यमातूनसुद्धा रुग्णांना मदत करण्याचा आपला मानस असून सर्व प्रकारच्या रुग्णांना नि:शुल्क व सवलतीची आधुनिक आरोग्य सेवा पुरविणार”, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी केले. दि. ८ फेब्रुवारी २०२० ला समाज भवन, सोनेगाव, नागपूर येथे आयोजित भव्य रोगनिदान व रुग्णभरती शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
या शिबिरात लता मंगेशकर हॉस्पिटलच्या मेडिसिन, सर्जरी, बालरोग, अस्थिरोग, प्रसूती/स्त्रीरोग, छातीरोग, कान-नाक-घसा, चर्मरोग व दंतरोग विभागातील विशेषज्ञांनी आपल्या नि:शुल्क सेवा रुग्णांना प्रदान केल्या. यावेळी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. आतापर्यंत एकात्मता नगर, जयताळा, सीमटाकळी, त्रिमूर्ती नगर, सोनेगाव या ठिकाणी आयोजित शिबिरांमध्ये हजारो रुग्णांनी तपासणी करून उपचार करून घेतले. पुढील शिबीर दि. १३ फेब्रुवारीला राहुल नगर (सोमलवाडा) येथील हनुमान मंदिरात संपन्न होईल.