काटोल : येनवा जि. प.सर्कल व बाजुच्या परिसरा मधील अनेक गावांमध्ये अवैध्य रित्या दारू विक्रीचा धुमाकूळ घातला असून दारूच्या व्यसनामुळे अनेक संसार उध्वस्त होत आहे.तरुण वर्ग मरणाच्या दरात उभा आहे या राक्षसी प्रवृतीला उत्तेजन देण्याचे काम दारू करीत आहे.हा त्रास महिलांना होत असुन मोठ्या प्रमाणात तरूण पिढी बरबाद होत आहे.
म्हणून या परिसरातील अवैध्य दारूची विक्री बंद व्हावी याकरिता ग्राम पंचायत सरपंच, पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली असून आज समीर उमप सदस्य जि. प.नागपूर यांच्याकडे या सर्व लोकांनी विशेषता महिला वर्गानी दारू बाबत चर्चा केली असता लगेच त्यांनी सर्वांना घेवून नागेश जाधव (उपविभागीय पो. अ.) श्री आचरेकर पोलिस निरीक्षक काटोल यांना निवेदन विनंती वजा तक्रार देण्यात आली.त्यावेळी उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात गेलो असता श्री पाटील हे उपस्थित नव्हते व कार्यालयाला कुलूप होते.
त्यामुळे शिष्टमंडळाकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.या शिष्टमंडळात बहुतेक सरपंच व पदाधिकारी उपस्थित होते.त्यामध्ये सरपंच दिग्रस दिनेश मानकर,प्रवीण आगरकर(उ. स. येनवा)चंद्रकांत महाजन(सरपंच सोनोली)उषाताई काळे(सरपंच इसापूर) सपणाताई चौरे(सरपंच इसापूर),कल्पना डवरे(सरपंच बोरी),सौ. चचाने(सरपंच खुटांबा),अर्चना इंगळे(सरपंच पांनवाडी )ग्राम पंचायत सदस्य अमिता ताई ठाकरे,स्वातीताई दिवरे,कुसुमताई वाघमारे, ग्रा. प सदस्या विनोद चौरे,बुद्धम्म तागडे,प्रदीप ठाकरे, संजय केने,राजुभाऊ विर,रवी भभुळकर,विवेक गडेकर,विजय ठाकरे,राहुल तरार,विजयाताई ठाकरे,गणेश ठाकरे,सतीश काळे, सोनू राऊत,नितीन आगरकर,राहुल वाघमारे,कृष्णा लगोटे, रजत वाघमारे,हर्षल काठोळे,लक्ष्मीकांत लाडे,राकेश झळके,निलेश गुंड,जितू काठोळे, इत्यादींच्या उपस्थिती मध्ये निवेदन देण्यात आले.परिसरातील अवैध्य दारू बंद न झाल्यास पुढील परिणामांना संबंधित विभाग जबाबदार असतील. वेळ पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाची तयारी निवेदन कर्त्यानी दर्शविली.