Published On : Thu, Feb 13th, 2020

Video : सावनेर येथे एका महिला डॉक्टरवर अ‍ॅसिड हल्ला

Advertisement

नागपूर: हिंगणघाटच्या घटनेतून समाजमन बाहेर येत नाही तोच, नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे एका महिला डॉक्टरवर अ‍ॅसिड हल्ला केल्याची घटना बुधवारी दुपारी १२.३० च्या सुमारास घडली आहे.

Gold Rate
Wednesday 19 March 2025
Gold 24 KT 88,900 /-
Gold 22 KT 82,700 /-
Silver / Kg 101,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुरातील मेयो रुग्णालयात काम करणाही ही महिला डॉक्टर एका सर्वेक्षणासाठी बुधवारी सावनेर येथे आपल्या चमूसह आली होती. सावनेरच्या पहिलेपारजवळच्या कळकळी महाराज मंदिराजवर ती असताना, आरोपी निलेश कन्हेरे हा २२ वर्षांचा युवक तिच्याजवळ आला आणि, तुझा चेहरा खराब करतो असे म्हणत त्याने तिच्या चेहऱ्यावर अ‍ॅसिड फेकले. यात या महिला डॉक्टरने चेहरा बाजूला केल्याने या अ‍ॅसिडचे काही कण बाजूला असलेल्या एका विद्यार्थिनीवर व अन्य एका महिलेच्या चेहºयावर पडले. यात या दोघींनाही गंभीर जखमा झाल्या आहेत.

हा प्रकार बघणाºया नागरिकांनी तात्काळ आरोपीला पकडून बेदम मारहाण केली व पोलिसांच्या स्वाधीन केले. महिला डॉक्टरसह अन्य दोन जखमींना तात्काळ नागपूरला रवाना केले असून पोलिस तपास सुरू आहे.

Advertisement
Advertisement