नागपुर – नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी लक्ष्मीनगर झोनचे निलंबीत कर संग्राहक आनंद लक्ष्मणराव फुलझेले यांना रुपये 93 लक्षचा अपहार केल्याप्रकरणी त्यांना म.न.पा. च्या सेवेतून बडतर्फ केले.
आनंद फुलझेले यांनी मालमत्ता कराच्या स्वरुपात करदात्यां कडून आर्थिक वर्ष 2014-15, 2015-16 आणि 2016-17 या काळात रुपये 93 लक्ष वसूल केले आणि त्यांना पावती सुध्दा दिली परंतू त्यांनी ही रक्कम महानगरपालिकेच्या फंडात जमा केली नाही आणि पावत्याही रद्द करुन टाकल्या त्यांनी 2002 ते 2007 च्या दरम्यान सुध्दा 15 लक्ष रुपयाचा अपहार केला होता. त्यासाठी त्यांना निलंबीत करुन विभागीय चौकशी करण्यात आली होती. चौकशी अंती त्यांच्यावर लावलेले आरोप सिध्द झाले त्यामुळे म.न.पा. आयुक्त् श्री. तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्र महानगरपालिका कायदयाच्या कलम 56 अन्वये त्यांना सेवेतून बडतर्फ केले.
आता त्यांना कोणत्याही प्रकाराचा सेवेचे आर्थिक लाभ मिळणार नाही.