रामटेक: श्रीराम शिक्षण संस्था द्वारा संचालित सर्व शाळांचे सारस्वत विद्यार्थी मंडळा तर्फे दास नवमीचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर श्रीराम शिक्षण संस्थेच्या सदस्या श्रीमती माणिकताई काशीकर,श्रीराम विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ईश्वर आकट सर, श्रीराम कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.गेडेकर मॅडम, पर्यवेक्षक मोहन काटोले सारस्वत विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष बबलू यादव व प्रमुख वक़्ते म्हणून समाजसेवक, व्यवसाय मार्गदर्शक सुनील तांदुळकर (माजी विद्यार्थी ) उपस्थित होते.
माता सरस्वतीच्या व सर्मथ रामदास स्वामी च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली . बबलू यादव सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला.या नंतर विजयी वर्गांनी मनाचे श्लोक सादर केले. आदल्या दिवसी झालेल्या कथाकथन स्पर्धेत क्रमांक आलेल्या विद्यार्थीं-विद्यार्थीनींना बक्षीस वितरण करण्यात आले.
प्रमुख वक्ता म्हणुन लाभलेले सुनीलजींनी स्वामी समर्थांचे जीवन चरित्र गोष्टीरुपाने सांगितले . अध्यक्षीय भाषणात माणिक काशीकर मॅडम यांनी मनाचे श्लोक व मनावर नियंत्रण व आवश्यकता यांवर मार्गदर्शन केले. आभार प्रदर्शन मंडळाचे सदस्या सौ.साळवे यांनी तर सुरेख अस संचलन चकोले यांनी केले. या प्रसंगी संस्थेच्या सर्व शाळांचे शेकडो विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व सदस्य व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारींनी अथक परिश्रम केले.