कन्हान : – युवा मित्र परिवार खेडी व्दारे राजे छत्रपती शिवराय जयंती थाटात साजरी करण्यात आली. राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती युवा मित्र परिवार खेडी व्दारे शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व मानवंदना करून वेशभुषेत घोडयावर बसलेले शिवराय, डि जे धुमाल सह मिरवणुक काढुन गावातील मुख्य मार्गानी भ्रमण करून ग्राम पंचायत कार्यालय परिसरात महाप्रसाद वितरण करून शिवराय जयंती थाटात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्विते करिता सुशिल ठाकरे, आकाश कोचे, अमोल नागपुरे, आशिष कोचे, राहुल वानखेडे, पंकज नागपुरे, दुर्गेश सावरकर, प्रकाश मोहिते, नितीन नागपुरे, नितीन इंगळे, प्रशांत चलपे, निकेश घरजाळे, गोलु मेश्राम, सुनिल कोचे, श्रीकांत चौध री, हेमराज वैद्य, तुकेश घरजाळे, खुशाल शेंडे, रोशन ठाकरे, रोशन गायकवाड, रामेश्वर नागपुरे, दुर्गेश मेश्राम, राहुल काळे, राजकुमार हुड, दिव्या, पायल, अवनी, सुनिल, अनिल ठाकरे आणि ग्रामस्थानी सहकार्य केले.