रामटेक :विद्यासागर कला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ सोहळ्यात आमदार तसेच विद्यासागर कला महाविद्यालयाचे अध्यक्ष ऍड. आशिषजी जयस्वाल बोलत होते.
विद्यासागर कला महाविद्यालयात आमदार ऍड. आशिष जयस्वाल यांचा मानपत्र, शॉल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. टी. डी. लोधी, सचिव श्रीमती अनीता जयस्वाल यांचा या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . पी. के. यू. पिल्लई यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना आमदार जयस्वाल यांनी आपण आपल्या मतदारसंघात , परिसरातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी नवीन उपक्रमांची निर्मिती करणे हे आपले प्रमुख उद्धिष्ट असून आपल्यावर रामटेकच्या जनतेने चौथ्यांदा विश्वासाने निवडून दिले असून आपण त्यांच्या विश्वासाला तडा पडू देणार नाही असे प्रतिपादन ह्या प्रसंगीकेले.
विद्यार्थ्यांतर्फे प्रकाश मर्सकोल्हे याने मानपत्राचे वाचन केले. डॉ. सावन धर्मपुरीवर यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. गिरीश सपाटे, डॉ. सुरेश सोमकुवर, प्रा. अनिल दाणी, डॉ. ज्योती कवठे, प्रा. रवींद्र पानतावणे, डॉ. सतीश महल्ले, डॉ. आशिष ठाणेकर, डॉ. पूनम लाड, कु. कीर्ती जयस्वाल, जितेंद्र बदनाग, संजय डोंगरे .युनूस पठाण, ररफिक कुरेशी, नाना हटवार. ललित कनोजे, विनोद परतेती यांनी प्रयत्न केले.