रामटेक: महाशिवरात्री निम्मित्याने पेंच व्याघ्र प्रकल्पातील श्रिभेज अंबाखोरी येथे भाविकांनी शिवपार्वती अंबाबाई चे दर्शन घेतले. या वेळी भाविकांनी हर हर महादेव चे जयघोष करीत दर्शन घेतले. मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला आले होते. वन परिक्षेत्र पूर्व पेंच पिपरिया अंतर्गत येत असलेल्या जंगलात पूर्वीपासून अंबाखोरी नावाने प्रसिद्ध असलेले निसर्ग निर्मित स्थळ अंबाखोरी पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे.
परंतु पेंच व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित झाल्यानंतर पर्यटकांना तिथे जाण्यासाठी कायद्याने बंदी झाली. मात्र शर्मा यांनी पेंच व्याघ्र प्रकल्प चे उपसंचालक यांच्या कडून परवानगी घेऊन एक दिवसासाठी शंकर पार्वतीच्या दर्षणाकरिता सर्व भाविकांना सुट दिली. चारशे च्या जवळपास कार आल्या , तसेच एस. टी.बसेस व वन्यजीव विभागाच्या गाड्यांनी भाविक भक्तांना दर्शनाचा लाभ झाला.
नियमाप्रमाणे वागण्याच्या सूचना पेंच व्याघ्र प्रकल्प चे वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एम ताटे तसेच सहा. वनक्षेत्र अधिकारी एस. व्ही परेकर यांनी दिल्या. अप्रिय घटना घडू नये म्हणून ठीकठीकाणी वनरक्षक , एस. टी .पी. एफ चे जवान तैनात करण्यात आले होते.
यात्रेला यशस्वी करण्यासाठी शर्मा, एम.एम ताटे, तसेच सहा.वनक्षेञ अधिकारी .एस.व्हि परेकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर वाडीवे ,खोरगडे, एस.बी.केकाण, प्रदीप गदळेब ,मनोज वंजारी,जीवन कदम वासनिक,मोरे,डुकरे,गायकवाड, राजु केंद्रे ,नवलकर वंजारी, आवारी , सहित आजू बाजूच्या गावातील लोकांनी परिश्रम घेतले……