Published On : Mon, Feb 24th, 2020

कामठी नगर परिषदेचा 53 करोड़ 50लक्ष 31 हजार 690 रूपयाचा शिल्लकी अन्दाजपत्रक मंजूर

Advertisement

कामठी :-नगराध्यक्ष मो शाहजहां शफ़ाअत यांच्या अध्यक्षतेखाली व उपाद्यक्ष शाहिदा कलिम यांच्या मुख्य उपस्थितीत पार पडलेल्या विशेष सभेत महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम नुसार सन 2019-20चे सुधारित व सन 2020-21चे अर्थसंकल्पीय अन्दाजपत्रक सादर करण्यात आले ज्यामध्ये 53 करोड़ 50लक्ष 31 हजार 690 रूपयाचा शिल्लकी अन्दाजपत्रक मंजूर करण्यात आला.यावेळी निर्वाचित सदस्य व नामनिर्देशित सदस्यांची उपस्थिति होती.

या अन्दाजपत्रकात जमीनी व इमारतीवर कर, मालमत्ता करावरील एकत्रित कर,शिक्षण कर, रोजगार हमी कर,वृक्षकर, जाहिराती फलकाचे कर, पानिपट्टी कर, सिनेमा /नाट्यगृह/सर्कस इतर प्रयोगावरील कर, स्वछता उपभोक्ता कर, इतर टॉवर टेक्स,अग्निशमन कर,दिवाबत्ति कर, बाजार ठेका वसूली,पानी नळ जोडनि कर, इमारत परवाना फि, व बांधकाम विकास शुल्क, विक्री व भाड़े आकार शुल्क आदिपासुन कामठी नगर परिषद ला वार्षिक महसूली तसेच भांडवली महसुलितुन 1 अरब 7 कोटी 64 लक्ष 85 हजार 313 रुपये प्राप्त होणार असून महसुली भांडवली तुन अखेरची शिल्लक 74 कोटी 29 लक्ष 11 हजार 690 रुपये आहे असा एकूण 18 अरब 19 कोटी 39 लक्ष सात हजार तीन रुपये वार्षिक महसुली भांडवल जमा होणार आहे त्यातून 1 अरब 28 कोटी 43 लक्ष 65 हजार 313 रुपये हे खर्च केले जाणार असून त्यातून 53 करोड़ 50 लक्ष 31 हजार 690 रुपये शिल्लक राहणार आहेत.

Gold Rate
23 April 2025
Gold 24 KT 96,500 /-
Gold 22 KT 89,700 /-
Silver / Kg 96,800 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या अन्दाजपत्रकात वाढिव तरतूद करण्यात आली आहे ज्यामध्ये शाळा फर्नीचर साहित्य, शाळा सुधारना, आरोग्यच्या दृष्टिकोणतुन पाण्याची टाकिव स्वछता, शहरात फवारणी करने, अतिक्रमित फुटपाथ दुकाण्रदाराची व्यवस्था, पाणीपुरवठा विशेष तरतूद, बालोद्यान विकास आदिचा समावेश आहे वेतन राखीव निधि तरतूद, पेंशन निधि तरतूद, आरोग्यच्या दृष्टीने साफ्सफाइची तरतूद, महिला व बालकल्याण वीभगसाठी तरतूद, खेळाडू व अपंग यांचे करिता निधिची तरतूद करण्यात आली तसेच कामठी नगर परिषद चे 2020-21चे प्रस्तावित अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आले .

यावेळी सभेला उपस्थित नगराध्यक्ष, उपाद्यक्ष यांच्यासह उपस्थित सर्व नगरसेवकानी टाळया वाजवूंन अभिनंदन प्रस्तवाचे स्वागत केले.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement