– तीन वर्षातील आकडेवारी, रेल्वे रुळ ओलांडताना नागपुरात सर्वाधिक बळी,लोहमार्ग विभागाअंतर्गत ६ ठाण्याची माहिती
नागपूर: पुढच्याला ठेच लागली की, मागचा शहाणा होतो, अशी म्हण आहे. मात्र, रेल्वे प्रवास करताना नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. त्यामुळे यापुर्वीच्या घटनांकडे दुर्लक्ष करीत रेल्वे रुळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतात. क्राqसगवरून जाताना रेल्वे नियमांचे पालन करत नाही. त्यामुळे अपघातात नाहक बळी जातो. रेल्वे नियमांचे पालन न केल्यामुळे आणि निष्काळजीपणामुळे तीन वर्षात म्हणजे २०१७-१८-१९ मध्ये एकून ७०८ लोकांना जीव गमवावा लागला.
लोहमार्ग, अजनी मुख्यालयाअंतर्गत नागपूर, इतवारी, गोंदिया, वर्धा, बडनेरा आणि अकोला अशी ६ रेल्वे स्थानके येतात. यापैकी पाच मध्य रेल्वे अंतर्गत तर गोंदिया रेल्वे स्थानक दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत येतो. प्रवाशांनी योग्य तिकीट घेवून प्रवास करावा. एका फलाटावरून दुसया फलाटावर जाताना एफओबीचा वापर करावा, रेल्वे रुळ ओलांडून जावू नये. रेल्वे क्राqसगवरून जाताना योग्य ती काळजी घ्यावी. आदी नियम ठरवून दिले आहेत. या नियमांची प्रवाशात जनजागृती केली जाते. यासाठी गर्दीच्या ठिकाणी तसेच ठिकाठीकाणच्या रेल्वे स्थानकावर पथनाट्य केले जाते. यामाध्यमातून प्रवाशांच्या निष्काळजीपणा दुर करण्याचा प्रयत्न केला जातो. याशिवाय पत्रक, बॅनर आणि उद्घोषणप्रणालीव्दारे जनजागृती केली जाते. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येते.
माहिती अधिकार कार्यकर्ता अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहिती अधिकाराअंतर्गत तीन वर्षांत ५३३ प्रवाशांचा मृत्यू झाला. यात वर्धा रेल्वे स्थानकाअंतर्गत सर्वाधिक म्हणजे १४१ तर त्यापाठोपाठ नागपूर अंतर्गत १२२ प्रवाशांचा मृत्यू झाला. इतवारी – १००, गोंदिया – ९७ आणि अकोला लोहमार्ग ठाण्या अंतर्गत ७३ प्रवाशांचा मृत्यू झाला. बडनेरा ठाण्याअंतर्गत एकही घटना नाही.
तसेच रेल्वे क्रासगवर केवळ पाच लोकांचा बळी गेला. या पाचही घटना बडनेरा रेल्वे स्थानकाअंतर्गत घडल्या. तर रेल्वे रुळ ओलांडताना एकून १७० लोकांचा मृत्यू झाला. यात नागपुरात सर्वाधिक म्हणजे ५९ तर त्या पाठोपाठ वर्धा रेल्वे स्थानकाअंतर्ग ५७ लोकांचा नाहक बळी गेला. अकोला-३२, बडनेरा-१५ आणि गोंदिया रेल्वे स्थानकावर ५ लोकांचा मृत्यू झाला. तीन वर्षातील आकडेवारी माहिती अधिकाराअंतर्गत कोलारकर यांना मिळाली आहे.