विविध विकास कामांवर होणार रु. ३०८.४७ कोटी खर्च
नागपूर: नागपूर सुधार प्रन्यास, स्टेशन रोड, सदर येथे आज बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सन २०२०-२१ या वर्षासाठीची अर्थसंकल्पीय बैठक पार पडली. या बैठकीत नासुप्र सभापती श्रीमती शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी, नागपूर श्री. रविंद्र ठाकरे, नासुप्रचे विश्वस्त श्री. भूषण शिंगणे, सह संचालक, नगर रचना श्री. नि सी आढारी, नासुप्रचे मुख्य अभियंता श्री. सुनील गुज्जेलवार, नासुप्रचे महाव्यवस्थापक श्री. राजेंद्र लांडे, कार्यकारी अधिकारी श्री. प्रशांत भांडारकर, नासुप्रचे मुख्यलेखा अधिकारी (वित्त) श्री. हेमंत ठाकरे, लेखा अधिकारी श्री. यशवंत ढोरे, वरिष्ठ लेखा लिपिक श्री. राजेश काथवटे उपस्थित होते.
नागपूर सुधार प्रन्यासच्या सन २०२०-२०२१ या वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार सुरवातीची शिल्लक रु. २ कोटी ३६ लक्ष धरून एकूण जमा रु. ३११.३० कोटी अपेक्षीत आहे. यात भांडवली जमा रु. १९८.५७ कोटी, महसुली जमा रु. ८०.६६ कोटी आणि अग्रीम व ठेवी जमा रु. २९.७० कोटींचा समावेश आहे.
नागपूर सुधार प्रन्यासद्वारे सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात भांडवली खर्च रु. १४७.०९ कोटी, महसुली खर्च रु. १०६.७० कोटी आणि अग्रीम व ठेवी जमा रु. ५४.६८ कोटी असे एकूण रु. ३०८.४७ कोटी खर्च करण्यात येणार आहे.
बैठकीतील प्रमुख मुद्दे
सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात….
१) नासुप्र निधीतून घरबांधणी कार्यक्रमांतर्गत रु. ८० कोटी व भूखंड व दुकानांच्या भाडेपट्ट्याद्वारे प्रव्याजी रु. १०० कोटी जमा अपेक्षीत आहे.
२) ५७२ व १९०० अभिन्यासामध्ये एकंदर रु. २ कोटी प्राप्त होणे अपेक्षीत असून या दोन्ही अभिन्यासामध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी रु. ३०.४५ कोटी खर्च करण्यात येणार आहे.
३) नासुप्र निधीतून विकासाची विविध कामे व रस्त्यांचे डांबरीकरण या शिर्षाअंतर्गत रु. १७ कोटी खर्च करण्याचे प्रावधान करण्यात आलेले आहे.
४) उद्यान, विकास, वृक्षारोपण या शिर्षाअंतर्गत रु. ४ कोटीचे प्रावधान करण्यात आले असून, विविध उद्यानाचे सोंदर्यकरण विकास आणि संगोपन करिता सदर निधी खर्ची करण्यात येणार आहे.
५) दलित वस्ती सुधार योजना आमदार निधी, खासदार निधी, मौजा मानेवाडा येथील ई-लायब्ररी, इस्लामिक कल्चरल सेंटरचे बांधकामाकरिता व इतर शासकीय निधीचे कामाकरीता येऊ. ३६.६८ कोटीचे प्रावधान केलेले आहे.
६) क्रीडांगणाचा विकास केन्द्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ या अभीयानाला पूरक म्हणून नागपूर शहरातील युवा पिढी मध्ये खेळाडू वृत्तीचा विकास करण्याचा दृष्टीने नागपूर शहरातील सुमारे १०० क्रीडांगणांचा दर्जा उंचाविण्याचे नासुप्रच्या उध्दिष्ट आहे त्या करिता रु. ३३ कोटी चे प्रावधान केलेले आहे.
७) शासन निर्णयानुसार सातव्या वेतनाचा लाभ सर्व कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी, निवृत्ती वेतन धारक यांना देण्यात येत असल्याने आस्थापना खर्चामध्ये रु. ८७ कोटीचे प्रावधान करण्यात आलेले आहे.