रामटेक उत्पादन शुल्क विभागीय भरारी पथकाने गोंडखैरी गावाच्या पूर्वेस अवैद्य व बनावट मद्याची वाहतूक पकडून सहा आरोपींना अटक करून रुपये 23 लाख 89 हजार 950 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. √ सदरची कारवाई विभागीय उपायुक्त मोहन वर्दे सर यांच्या मार्गदर्शना खाली निरीक्षक विभागीय भरारी पथक नागपूर एस.पी. दळवी यांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार गावाच्या पूर्वेस कळमेश्वर रोड च्या उजव्या बाजूस बोलेरो पिकप व्हॅन MH 31 FC 0805 या वाहनातून 90 मि.ली क्षमतेच्या रॉकेट देशी दारू संत्रा या ब्रँडच्या दारूची वाहतूक करून तेथेच उभा असलेल्या टाटा कंपनीचा 12 चार चाकी ट्रक MH 34 BG 5319 मध्ये व टाटा मोटर्स कंपनीचे वाहन क्रमांक MH 34 BB 951 या वाहनांमध्ये दारू साठा देत असल्याचे दिसून आले. यावेळी *ट्रकच्या केबिनच्या मागील बाजूस व हाऊद हौदात जेथून सुरुवात होते तेथे एका विशिष्ट कप्पा बनवून
त्यामध्ये हे बॉक्स भरलेले होते. या सर्व कारवाईत वरील तीन वाहने जप्त करण्यात आली, तसेच चौकशी दरम्यान शंभू उर्फ दिलीप बाबुराव सूर्यवंशी राहणं सावरकर नगर वर्धा रोड नागपूर यांच्या मालकीच्या शेतात जाऊन शेतातील घरात तपास केला असता तेथे *देशी दारू सत्रांच्या 40000 बनावट लेबल असल्याचे दिसून आले.
– बोलेरो पिकप येथे पाच लाख 90 मी.लीच्या 100 खोक्यांमध्ये 10000 बाटल्या किंमत 2,60,000
– एका कापडी पिशवीत 180 मिली च्या विदेशी दारूच्या 15 बाटल्या रुपये देशी दारूच्या बाटल्या रुपये 2250/-
– एका कापडी पिशवी 375 मिली च्या विदेशी दारू च्या पाच बाटल्या किंमत 1700
– बारा चाकाचा ट्रक रुपये दहा लाख टाटा कंपनीचा चार चाकी वाहनां मध्ये मागच्या सीटवर 90 मी देशी दारूच्या दहा पेट्या किंमत 26,000
– टाटा मोटर कंपनीची चार चाकी गाडी रुपये 4,00,000
– रॉकेट देशी दारू संत्रा 90min क्षमतेच्या बाटलीवर लावलेले 40,000 लेबल अंदाजे किंमत दोन लाख असा *एकूण 23 लाख 89 हजार 950 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत शंभू उर्फ दिलीप बाबुराव सूर्यवंशी सावरकर नगर वर्धा रोड नागपुर , धीरज मोतीलाल बहुरिया बल्लारशा जिल्हा चंद्रपूर , सागर भीमा कुंबल वार राजुरा जिल्हा चंद्रपूर , सागर सुरेश बहरिया बल्लारशा जिल्हा चंद्रपूर, नरेंद्र राम किशोर बर्मा जिल्हा चंद्रपूर यांच्यावर मुंबई दारूबंदी कायदा 1949 चे सुधारित 2005 चे कलम 65 (ई) (ए ) 81 व 83 नुसार कारवाई करण्यात आलेली आहे यापैकी शंभू सूर्यवंशी हा आरोपी वैद्यकीय कारणास्तव शासकीय रुग्णालयात असून, उर्वरित चार आरोपींना न्यायालयाने जेल पास दिला आहे. त्यामुळे त्यांची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली आहे पुढील तपास एस.पी.दळवी निरीक्षण करत आहेत.
सदरची कारवाई निरीक्षक सुहास दळवी यांनी केली. या कारवाई मध्ये,सुनील सहस्त्रबुध्दे अशोक शितोळे निरीक्षक, रावसाहेब कोरे व दुय्यम निरीक्षक विशाल कोल्हे, धनराज राऊत तसेच कॉन्स्टेबल प्रकाश मानकर, अंकुश भोकरे, प्रशांत घावडे, प्रमोद पिंपळे, राहुल सपकाळ, सुधीर मानकर महादेव कांगणे इत्यादी नी सहभाग घेतला व मोहीम यशस्वी केली.