कामठी -चीन देशातून जगभर पसरलेला धोकादायक कोरोना व्हायरस ने अनेक देशांमध्ये दहशत माजवली आहे .चीन, आस्ट्रेलिया आदी पाश्चात्य देशात या रोगाने थैमान घातले असून हजारोच्या संख्येने तेथे रुग्णालयात उपचार घेत आहेत .भारतातही कोरोना ची साथ आली असून भीतीचे वातावरण पसरले आहे.याकोरोना व्हायरस च्या भीतीने अनेकांनी यंदा होळी व रंगपंचमी सणावर भीतीचे सावट पसरले होते
यंदा होळी व रंगपंचमी सणावर कोरोना व्हायरस चे सावट असल्याने सतर्कता बाळगली जात आहे एरव्ही मेव्हणा मेव्हनी ला, पती पत्नीला तसेच मित्र मैत्रिणी रंग लावून रंगात भिजून जातात स्वतःचे चेहरेही ओळखू येणार नाहीत इतकी होळी खेळतात मात्र या व्हायरसमुळे अनेक जण व अनेक जणी अंगाला रंग लावू देणार नव्हते अशीही चर्चा ऐकिवास येत होती.
तहसीलदार अरविंद हिंगे:-कोरोनास घाबरू नका
कोरोना विषानुबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही याबाबत विशिष्ट काळजी घ्यावी असे आव्हान कामठी चे तहसिलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे वास्तविकता खोकला, ताप तसेच श्वसना मधील त्रास ही कोरोना लागण झाल्याची प्रमुख लक्षणे आहेत मात्र याबाबत योग्य तपासणी नंतर च कोरोना ची लागण झाल्याची खात्री करता येते त्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता , शंका आल्यास योग्य तपासण्या करून घ्याव्यात ,कोरोना आजारामध्ये व्यक्तीला मोठ्या प्रमाणात लक्षणे दिसून येत नाहीत .
तेव्हा याबाबत काळजी घेण्याच्या दृष्टिकिनातुन कोणीही खोकलताना किंवा शिंकतांना तोंडाला रुमाल लावावा , नेहमी हात स्वच्छ धुवावेत , अगदी साबणाने वा पाण्याने स्वच्छ हात धुतले तरी चालतात .कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी सर्वांच्या संपर्कात येणाऱ्या वस्तुंना स्पर्श करू नये, लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवावे .सार्वजनिक तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच तोंडाला मास्क वापरण्यापेक्षा रुमाल चा उपयोग केल्यास तितकेच बरे…कोरोनावर सावधगिरी बाळगणे हेच मुख्य औषध आहे
संदीप कांबळे