Published On : Fri, Mar 13th, 2020

मला कोरोना झालेला नाही, मी ठणठणीत’, कोरोना झाल्याच्या अफवेवर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

Advertisement

नागपूर : मला कोरोना झालेले नाही, मी ठणठणीत आहे, असं स्पष्टीकरण नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांवर प्रेस कॉन्फरन्स घेत देण्याची वेळ आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे दिवस रात्र आरोग्य यंत्रणेसोबत मिळून कोरोनाला थांबवण्यासाठी प्रयत्न करत असताना एका वेगळ्याच अडचणीत सापडले आहेत. कारण काही माध्यमांनी त्यांच्या संदर्भात भ्रामक बातमी दिली. यामुळं नागपूर जिल्हा प्रशासनात चांगलाच गोंधळ उडाला आहे.

‘नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे खुद्द कोरोना बाधित झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे’, अशी खोटी बातमी काही माध्यमांवर दाखवण्यात आली होती. त्यामुळे आज सर्व धावपळीतून वेळ काढून जिल्हाधिकाऱ्यांना ‘मला कोरोना झालेला नाही, मी ठणठणीत आहे’, असं सांगण्याची वेळ आली. अशी खोटी बातमी देऊन नागपुरात भीतीचे वातावरण पसरविणाऱ्या संबंधित माध्यमांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली असून कठोर कारवाई केली जाईल अस ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Today's Rate
Friday13 Dec. 2024
Gold 24 KT 77,700/-
Gold 22 KT 72,300/-
Silver / Kg 90,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी असलेले रवींद्र ठाकरे हे गेल्या वर्षी सप्टेंबरपासून त्याठिकाणी कार्यरत आहेत. रवींद्र ठाकरे यांना दीड वर्षापूर्वी भारतीय प्रशासन सेवेत पदोन्नती मिळाली होती. याआधी त्यांनी अतिरिक्त आयुक्त पदासाठी काम केले होते. पण गेल्याच वर्षी त्यांची पदोन्नती करत त्यांना जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली.

अफवांवर विश्वास ठेऊ नये

कोरोना विषाणू हा हवेतून पसरत नाही. त्यामुळे कायम मास्क लावणे चुकीचं आहे. एन95 हे मास्क सर्वसामान्यांसाठी नाहीत, ते मास्क डॉक्टर आणि कोरोनाच्या रुग्णांसाठी आहेत. सॅनिटाझरला सध्या खूप मागणी आहे. मात्र, हात धुण्यासाठी सॅनिटाझरचा आग्रह धरू नका. साबणाने हात स्वच्छ धुतले तरी चालतील, असंही टोपे म्हणाले. पुण्यातील अनेक आयटी कंपन्यांनी घरुन कामाला परवानगी दिली आहे, ही गोष्ट स्वीकाहार्य आहे. सध्या परिस्थितीत हातात आहे. मात्र, पुढे मागे तसं काही वाटल्यास शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.

Advertisement