– कढोली गावातील एकही अर्ज मंजूर नाही
कामठी : बेघर, अल्प तसेच अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबाना घरे देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन वर्षांपूर्वीच प्रधानमंत्री आवास योजना लागू केली या योजनेअंतर्गत सन 2022 पर्यंत कामठी तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व बेघर आणि गरीब कुटुंबाना मालकी हक्काची कायमस्वरूपी घरे देण्यात येणार असे गृहीत धरल्यावरून अपेक्षित लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधिताकडे अर्ज सादर केले मात्र कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात मोडणाऱ्या कढोली सारख्या गावातील एकही अर्ज मंजूर न झाल्याने अपेक्षित लाभार्थ्यांना या घरकुल योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.
तसेच कढोली गावातील रामाजी रोहणकर यां शेतमजुराला पक्क्या घराची अत्यंत आवश्यकता असल्याने आवास योजनेतील विविध योजने अंतर्गत संबंधित विभागाकडे अर्ज केले इतकेच नव्हे तर पंतप्रधान आवास योजनेत सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले तरीसुद्धा या अपेक्षित लाभार्थ्यांना लाभ मिळू शकला नाही त्यातच काही गावातील बोगस लाभार्थ्यांना बिनधास्तपणे राजकीय आशीर्वादातून घरकुलाचा लाभ देण्यात आला परिणामी घरकुलाचे बोगस लाभार्थी तुपाशी आणि खरे मात्र उपाशी अशी अवस्था झाली आहे तेव्हा ‘सर्वांसाठी घरे 2022’या योजनेअंतर्गत नागपूर महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)द्वारा राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील घोळ आणि अंमलबजावणीतील पक्षपातीपणाचा तीव्र निषेध व्यक्त करीत या प्रकरणात सखोल चौकशी करून योजनेचा अपेक्षित खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी सरपंच प्रांजल वाघ यांनी केले आहे.
प्राप्त माहितीनुसार सरपंच प्रांजल वाघ यांनी कढोली गावातील अपेक्षित कुटुंबाना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी ऑनलाईन पद्धतीने एमएमआरडीए कडे घरकुलाचे अर्ज सादर केले रीतसर तसे प्रति अर्ज 40 रुपये फी सुद्धा भरण्यात आली आज वर्ष लोटत आले तरोसुद्धा लाभ मिळू शकला नाही .
वास्तविकता कढोली गावातील रामाजी रोहणकर यांची पत्नी काही वर्षांपूर्वीच अपघाती मरण पावली कुटुंबाचा भार सांभाळता सांभाळता घराचे पक्के बांधकाम करणे पेलत नसल्याने घरकुल योजनेतून लाभ मिळेल या आषेतून तीन वेळा अर्ज सादर केले घरकुल मिळेल या प्रतीक्षेत अजूनही कुळाच्या घरात राहणे सुरू आहे मात्र संबंधित विभागाच्या हेकेखोर पना मुळे या अपेक्षित लाभार्थ्याला घरकुलचा लाभ मिळू शकला नाही यासारखे कित्येक कुटुंब असे आहेत की जे घरकुल साठी पात्र आहेत त्यांनी अर्जसुद्धा सादर केला आहे मात्र त्यांना अजुनही लाभ मिळू शकला नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल…
वास्तविकता पंतप्रधान आवास योजना च्या अंमलबजावणीसाठी नियुक्त केलेल्या केपीएमजी या संघटनेला ग्रामीण कामांचा कुठलाही अनुभव नाही तसेच काही घरकुल प्राधान्य क्रमाने निवडून मंजूर करण्यात आले मात्र अपंग , विधवा, भूमिहीन यांना प्राधान्य देण्यात न आल्याने घरकुल लाभापासून वंचित राहावे लागले,तर चौकशीसाठी नेमण्यात आलेले अधिकारी ग्रामपंचायत मध्ये येऊन चौकशी न करता काही राजकीय कार्यकर्त्यांना घेऊन चौकशी करतात तसेच पक्षभेद करून योजनेचा गैरवापर करीत आहेत परिणामी कढोली गावातील एकही लाभार्थ्यांचा अर्ज मंजूर झालेला नाही, त्याचप्रमाणे लाभार्थी निवडीत अनियमितपणा झालेला आहे तर अनेक दलाल राजकीय वरदहस्त मुळे पैसे उकळून घरकुल मंजूर करून देण्याचे आश्वासन देत आहेत
तेव्हा शासनाने लागू केलेली ही पंतप्रधान आवास योजना ही कुण्या एका राजकीय पक्षातील लोकांसाठी नसून समस्त अपेक्षित लाभार्थ्यासाठी आहे तेव्हा पंतप्रधान आवास योजनेत उपरोक्त नमूद अशे अनेक घोळणीशी प्रकारातील मनमानी प्रकार बंद व्हायला पाहिजे व सर्वाना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी सरपंच प्रांजल वाघ यांनी केला आहे.
– संदीप कांबळे,कामठी