नागपुर– कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार तर्फे लॉकडाउन करण्यात आला असुन सरकार ने जाहीर केले आहे की कोणीही व्यक्ती उपाशीपोटी राहणार नाही. परंतु रस्त्यांवर राहणारे त्यांच्या जेवणाची सोय होत असुन नरसाळ्यात राहणारे मध्यम-गरीब लोकं हातावर आणुन पानावर खाणारे यांना मात्र उपासमारीची वेळ येत आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणारे शेखर दंताळे सामाजिक कार्यकर्ता यांचा व्हाट्सअप गृप आहे.
शेखरभाऊ दंताळे समर्थक या गृपवर लोकांनी आम्ही जगायचे कसे, पैसे संपलेत असे मसेज दिलेत काहीनी शेखर दंताळे यांना व्ययक्तीक फोन केलेत. शेखर दंताळे व त्यांचे मित्र सहकारी प्रकाश कैकाडे यांनी कूपन देऊन किराणा दुकानातुन धान्य देणे सुरू केलेत.
त्यामुळे नरसाळ्यातील जनतेला धान्य पुरवठा होऊन घरातली चूल पेटली.काही लोकांचे हातावर आणणे व पानावर खाणे असुन काही लोकांकडे रेशन कार्ड नाही तर काही लोकांची नौकरी सुटली होती त्यात रोजगार सुध्दा बंद झाला अशा लोकांना आम्ही शेखर दंताळे व प्रकाश कैकाडे हे शेखरभाऊ दंताळे समर्थक या गृप च्या माध्यमातून लोकांना देवदूत बनून मदत करीत आहेत.