रामटेक तालुक्यात संचार बंदितही अवैध दारू विक्री सुर आहे. नुकतेच नगरधन परिसरा मधे गुन्हे शाखा पोलीस नागपूर विभाग तर्फे एस राकेश ओला यांना प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने प्रोविजनल डी.वाय.एसपी राजश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगरधन आणि परिसरातील मोहफुलाची दारू निर्मिती , सप्लायर , व विक्रते यांच्या विरोधात धडक मोहीम राबविण्यात आले.
प्राप्त माहिती नुसार असे निर्देशनास आले की संपूर्ण भारतात लॉक डाऊन झाल्या पासून दारू पिनाऱ्यांची फजिती झाल्या मुळे त्यांनी नगरधन या गावाकडे धाव घेतली नगरधन येथील काही दारू निर्माते , सप्लायर चांगली किंमत मिळत असल्याने जास्तच सक्रिय झाल्याने नागपूर परिसरातील काही लोक मोठ्या प्रमाणात येवू लागले .या समस्या ची संपूर्ण गावभर चर्चा होऊ लागली. गाव बंदी करू सुद्धा प्रमाण वाढू लागल्याने याची तक्रार उच्च अधिकारी पर्यंत पोहचली व ही कारवाही करण्यात आली.
कारवाही राधेश्याम भगवान नगरीकर ( 36) व नलू राधेश्याम भगवान वार्ड नंबर 1 नगरधन या सप्लायर चा घरी पोलिसांनी धाड मारून 14 लिटर मोहफुलाचे दारू किंमत 1400 रुपये जप्त केले. रामटेक पोलीस कार्यालय मधे यांनी तक्रार नोंदवली असून पुढे कारवाई करण्यात येणार आहे.
यामध्ये पोलीस निरीक्षक सचिन मंत, शिपही राजेंद्र सोणेडीया, नाना राऊत, दिनेश सदापुरे , अमोल वाघ, विपीन गायधने, राधेश्याम कामडे , शैलेश यादव या पोलिसांनी कारवाई केली.
या कारवाई मधे डी. वाय. एस. पी.राजश्री पाटील यांनी नगरधन सरपंच प्रशांत कामडी, पोलीस पाटील नितेश सावरकर, पंचायत समिती सदस्य भुषण होलगीरे , व गावातील काही विश्वस्तांनी त्यांनी घेऊन संपूर्ण गावातील मोहफुल दारू निर्मित , सप्लायर व विक्रेता यांना गोळा करून त्यांना सांगितले की या दारू मुळे नगरधन गावामधे कुनितरी दारू चे माध्यम साधून कोरोना घेऊन येईल आणि अख्खे गाव नष्ट कराल त्यामुळे आता पर्यंत चालत असलेला हा अवैध कारभार तत्काळ बंद करण्याचे आदेश दिले..
रामटेक तालुक्यात संचार बांदितही अवैध दारू विक्री.
.जिल्हाधिकारी याचे आदेशाची पायमल्लीं. लॉक डाउन सूरुच असताना गूटखा, खर्रा, दारूची बैक डोअर ने सर्रास विक्री सुरू आहे पुलिस प्रशासन ह्या गंभीर समस्या वर काय् भूमिका घेतात ? ह्या कडे जागरुक लक्ष ठेउन आहे।