Advertisement
मुंबई : वाटलं होतं लोकांची चूल पेटवण्यासंदर्भात बोलतील परंतु साहेब दिवा पेटवण्याचा संदेश देवून गेले अशी खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
आज सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केले. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ९ वाजता देशवासियांना संबोधित केले मात्र या भाषणातून देशवासियांच्या पदरात पुन्हा एकदा निराशा पडली आहे असेही नवाब मलिक म्हणाले.