कामठी:-आरोग्य विभागातील डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचारी व पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस कुटुंबा पासून दूर राहून गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधासाठी अथक व्यस्त आहेत . नागरिकांना त्यांच्या कार्याचे कौतुक होत असताना मात्र काही रिकाम टेकडे अजूनही रस्त्यावर येत आहेत.
दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फैलावत असून कामठी तालुक्यात संशयितांची संख्या ही 600 च्या वर गेली आहे यात खबरदारी घेत डॉक्टर्स आरोग्य कर्मचारी सह पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस शर्तीचे प्रयत्न करीत आहेत .
अपुऱ्या सोयी सुविधासह हा आरोग्य विभाग कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मैदानात उतरला आहे .पोलीस वर्ग नियम व कायद्याचे पालन करीत कर्तव्यात उतरले आहेत मात्र काही रिकामटेकडे चे रस्त्यावर फिरणे काही कमी होत नाही .तेव्हा अशा बिकट परिस्थितीत कोरोना चा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात येत आहे
संदीप कांबळे कामठी