Advertisement
14 तारखेनंतर लॉकडाउनचा तपशील होणार जाहीर
मुंबई. महाराष्ट्रातील लॉकडाउन 14 एप्रिलनंतरही असाच लागू राहणार असल्याची घोषणा शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. हा लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. हा लॉकडाउन कसा राहील, परीक्षा आणि उद्योगांसह छोट्या व्यापारांचे काय याचा तपशील 14 एप्रिलनंतर जारी केला जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यानंतर उठलेल्या शंका आणि चर्चांना विराम लावण्यासाठी मुख्यमंत्री जनतेसमोर आले. सोशल मीडियावरून लाइव्ह संवाद साधताना त्यांनी सर्व अफवा थांबवत हा लॉकडाउन 30 एप्रिलपर्यंत वाढत असल्याचे जाहीर केले.