Advertisement
मुंबई महाराष्ट्र सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 15 एप्रिल रोजी काढलेल्या पत्रानुसार कोव्हीड 19 च्या पार्श्वभूमीवर 8 व 15 जानेवारी 2020 च्या शासन निर्णयात अंशतः बदल करीत पालकमंत्र्याचे जिल्हे बदलले आहेत.त्यामध्ये भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनिल केदार यांच्याकडे देण्यात आले.
तर गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे ओबीसी भटक्या विमुक्त जाती तसेच भुकंप पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे म्हटले आहे.यापुर्वी भंड़ाराचे पालकमंत्रीपद हे विश्वजित कदम यांच्याकडे तर गडचिरोलीचे पालकमंत्रीपद हे एकनाथ शिंदे यांच्याकडे होते.