रामटेक तालुक्यातील वास्तव. दारू दुकानातील शिल्लक मालाच्या नोंदी नाहीत..
गावठी दारूचा सुळसुळाट , अबकारी विभाग झोपेत. ….
रामटेक: एक महिन्यापासून शासकीय परवाना दारू दुकाने बंद आहे. अवैधरीत्या दारू चा काळाबाजार करणाऱ्या कडील दारूचा साठा संपत आला. दारूच्या आहारी गेलेल्यांना नशा करणे ही त्यांची शारीरिक गरजच आहे. ही परिस्थिती पाहून आज मोठ्या गावा सह ग्रामीण भागात गावठी दारूचा सुळसुळाट झाला आहे. अबकारी विभागाचे
या गोष्टी कडे पूर्णता दुर्लक्ष असून लॉक डाऊन मध्ये साखरझोप घेत आहेत. अबकारी विभागाने जिल्ह्यात दारूबंदी झाल्या नंतर अब्बल दोन तीन दिवसांनी दारूची दुकानांना सील लावले. सिल लावताना दुकानात शिल्लक माला आहे याची नोंद नाही केली . सगळे दुकानदाराच्या पथ्यावर पडले दुकाने सील जरी असली तरी मागच्या दारातून काळाबाजार सुरू झाला. अबकारी विभागाच्या आशीर्वादाने रामटेक परिसरात दारू विक्रीचे निर्माण करणाऱ्या दोन-तीन दारू दुकानदारांनी लॉक डाऊन च्या काळात लाखो रुपये कमावले.
अबकारी विभागाने जर सील केला असता तर काळाबजा राला निर्बंध आले असते दारू दुकानदार व अबकारी विभागाने स्टॉक सील नाही केला. त्यामुळे काळाबाजार करण्यात अबकारी विभागाची महत्त्वाची भूमिका संशयित आहे. सध्या काळाबाजार करणाऱ्यांकडे दारूचा स्टॉक कदाचित जर संपलेला असेल तर याचा फायदा गावठी दारू विक्रेते उचलत असल्याचे चित्र निदर्शनास येत आहे.