कामठी :-लॉकडाऊन दरम्यान कुणीही गरजू नागरिक धान्यापासून वंचित न राहावे यासाठी चंद्रपूर व गडचिरोली चे पालकमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री ना विजय वडेट्टीवार कडे कामठी शहरातील गरजू नागरिकांसाठो कामठी विधानसभा युवक कांग्रेस च्या पदाधिकारो च्या वतीने मागणी करण्यात आली होतो यावर पालकमंत्री ना वडेट्टीवार ने या मागणीला मान्य करीत कामठी शहरातील गरजू नागरिकांसाठो हजार धान्य किट देऊन मदत केली.
या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे सचिव इरशाद शेख यांनी नामदार विजय भाऊ वडेट्टीवार व महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे महासचिव शिवानी वडेट्टीवार यांचे मनपूर्वक आभार मानले याप्रसंगी नागपुर जिला युवक कांग्रेस चे महासचिव सलामत अली, कामठी-मौदा विधानसभा चे अध्यक्ष फैसल नागानी , नागपुर जिला युवक कांग्रेस चे सोशलमीडिया इंचार्ज संदिप जैन, कामठी-मौदा विधानसभा युवक कांग्रेस के सोशलमीडिया प्रमुख राशीद अंसारी प्रामुख्याने उपस्थित होते.