नागपूर– 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागपूर शहर च्या वतीने कोरोना व्हायरस ने प्रभावित झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत असलेल्या वैद्यकीय सेवेत काम करीत असलेल्या चमुसाठी सुरक्षा प्रदान करणाऱ्या पीपीई किट्स नागपूर शासकीय मेडिकल इस्पितळाच्या आवारात अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांना मनसे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या.
विविध भागात जेवणाच्या साहित्याचे वाटप असो वा आरोग्यासाठी काळजी घेणाऱ्या वैद्यकीय चमुच्या सुरक्षेसाठी असणारी पीपीई किट्स हे देणे असो हे आमचे कर्तव्य असून आज जरी 100 चांगल्या दर्जाच्या किट्स देत असलो तरी एवढ्यावर न थांबता पुढेही आमच्या परीने आवश्यक गोष्टीची पुर्तता करण्यासाठी तत्पर राहू असे मनोगत राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले
साध्य परिस्थितीत आम्हाला आवश्यक असलेल्या बाबीची पूर्तता केल्याबद्दल डॉ. सजल मित्रा, डॉ अविनाश गावंडे यांनी मनसेच्या कामाचे कौतुक केले, या कार्यक्रमासाठी हेमंत गडकरी यांचे सोबत शहर अध्यक्ष अजय ढोके व विशाल बडगे, ऍड रणजित सारडे, ऍड तेजस केने,राहुल अलोने,दत्ता साकुलकर, निखिल झाडे,नितीन बंगाले, विशाल इंगळे, धीरज गजभिये,पवन साहू,दीपक उजेनकर, निशांत चव्हाण,अनिकेत दहिकर,समीर अरबट,अनिल भावे,यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी मार्ड चे डॉ. निलेश देशपांडे, व इतर उपस्थित होते कार्यक्रमात सहभागी सर्व डॉक्टर यांचे मनसे च्या वतीने तुळशीचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.