Published On : Thu, May 14th, 2020

नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांसाठी एका महिन्यात 1280 अतिदक्षता खाटांचे सुसज्ज रुग्णालय

नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे अशा रुग्णांच्या सध्या उपचारासाठी असलेल्या सुविधामध्ये वाढ करुन अतिदक्षता कक्ष, प्रत्येक बेडवर ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदी सुविधा या उपचारासाठी अत्यंत आवश्यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत असलेल्या विद्यमान व्यवस्थेत बदल करुन केवळ एक महिन्यात सुसज्ज ‘कोविड-19’ हॉस्पिटल तयार करुन 1 हजार 280 रुग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने विशिष्ट कोविड रुग्णालय, कोविड आरोग्य केंद्र व कोविड दक्षता केंद्र उभी केली आहेत. याशिवाय कोविड-19 संशयितांकरिता विलगीकरण केंद्र उभारण्यात आलेली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सैनिक, सचिव अजित सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथे 1 हजार 280 रुग्णांकरिता दोन स्वतंत्र कोविड हॉस्पिटल सुरु झाले आहे.

Gold Rate
Tuesday 28 Jan. 2025
Gold 24 KT 80,300 /-
Gold 22 KT 74,700 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील ट्रामा केअर सेंटर या नवीन इमारतीमध्ये एकूण 262 खाटांची सोय (60 खाटा ICU व 202 खाटा HDU) करण्यात आली आहे. 262 खाटांपैकी 129 खाटांचे मेडिकल गॅस पाईपलाईन व इतर अनुषंगिक उपकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 150 तासांच्या आत पूर्ण करण्यात आले आहे. तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील 2016 मध्ये बांधून झालेली पाच मजली सर्जिकल कॉम्पलेक्स इमारत होती. या इमारतीत अस्तित्वातील 13 वॉर्डस्ं चे आधुनिकीकरण व नवीन 9 वॉर्डस्ं सह एकूण 22 वॉर्डस्ं कोविड-19 च्या 568 गंभीर रुग्णांसाठी (174 ICU व 394 HDU खाटा) सुसज्ज सोय केवळ 20 दिवसांत पूर्ण झाली आहे.

कोविड हॉस्पिटलची निर्मिती करतांना आवश्यक पार्टीशन्ससह प्रामुख्याने Medical Gas Pipeline, Suction, Oxygen supply उपकरणे व ऑक्सिजन बँक प्रस्थापित करण्याकरिता शेडची उभारणी करणे व सर्व अत्याधुनिक उपकरणे स्थापित करणे, प्रसाधनगृह तयार करण्यात आली आहे. 568 कोविड-19 रुग्णांना अतिदक्षतेची सेवा उपलब्ध असणारे दक्षिण-मध्य आशियातील सर्वात मोठे कोविड रुग्णालय सज्ज झाले आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर परिसरात प्रधानमंत्री स्वास्थ योजना अंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या (G+2) इमारतीत 120 गंभीर रुग्णांकरिता अतिदक्षता विभाग ऑक्सिजन बँक व इतर उपकरणे स्थापित करण्याकरिता देखील शेडसह सोय व परिसरातील इतर 10 वॉर्ड्सना जोडण्याकरिता अतिदक्षता विभागापासून स्वतंत्र पाथ-वे तयार करण्यात आला. ही सर्व कामे 15 दिवसात पूर्ण करण्यात आली आहेत.

याच परिसरातील उपलब्ध असलेल्या एकूण वॉर्डस्ं पैकी 8 वॉर्डस् चे नुतनीकरण करण्यात आले असून 330 कोविड रुग्णांसाठी (60 अतिगंभीर रुग्णांसाठी व उर्वरीत 270 गंभीर रुग्णांसाठी) हे वॉर्डस् पूर्ण क्षमतेने वापरण्यात येणार आहेत. या वॉर्डस्5मध्ये रुग्ण दाखल असताना देखील विशेष काळजी घेऊन मेडिकल गॅस पाईपलाईनसह इतर सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

कोविड हॉस्पीटल तयार करताना वॉर्डस्ं मध्ये सारी आजाराचे रुग्ण तर काही ठिकाणी कोविड-19 चे रुग्ण देखील ॲडमिट असल्यामुळे कंत्राटदाराचे मजूर पळून जात होते. पेशंट असलेल्या वॉर्डमध्ये सदर मजूर काम करीत असल्याने आवश्यक दक्षता घेताना रुग्णांनाही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे.

Advertisement