दैनिक अभिकर्ता व गरजू कुटुंबाना अन्नधान्य व किराणा किट वितरित।
रामटेक– महाकवी कालिदास सहकारी पत संस्था रामटेकच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या कार्यालयात अन्नधान्य व किराणा किट वितरित करण्यात आली.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून किराणा व भाजीपाला सोडल्यास सर्व दुकाने,व्यापारी प्रतिष्ठाने बंद असून दैनिक अभिकर्ता रामटेक शहर व ग्रामीण भागातून दररोज डेली व आरडी कलेक्शन करीत असून त्यावर मिळणाऱ्या कमिशनवर आपले कुटुंब व घर चालवतात.पण दुकाने बंद असल्याने व्यवसाय ठप्प असून जवळपास 18 ते 20 अभिकर्त्यांचे मासिक उत्पन्न मंदावले असून ते प्रचंड संकटात सापडले आहेत.
अशा वेळी ज्या संस्थेसाठी ये अखंड कार्यरत आहेत त्या संस्थेने उत्तरदायित्व म्हणून तांदूळ 10किलो,गहू 10 किलो,तेल2 किलो,1किलो साखर,1किलो चना डाळ ,1किलो तुळीची डाळ,500 ग्राम निर्माण पाकीट, चहा,हळद,तिखट मीठ 1 किलो,लाईएफबॉय 1 सर्फ एक्सेल 1 साबण वितरित केले.
यासोबतच संस्थेशी जुळलेल्या गरजू व होतकरू कुटुंबानाही यावेळी अन्नधान्य व किराणा किट वितरित करण्यात आली.यावेळी माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर,पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे, API निशा भुते,किशोर रहांगडाले, चरण यादव संस्थेचे कर्मचारी व अभिकर्ता वर्ग उपस्थित होते.-
संस्थेच्या वतीने यापूर्वी पंतप्रधान सहायता निधीत अकरा हजार रुपये व मुख्यमंत्री सहायता निधीत पाच हजार रुपये जमा केले आहेत. दैनिक अभिकर्त्यांना किट वितरित केल्या असून गरजू कुटुंबाना किट वितरित करणार आहेत.