कन्हान : पोलीस स्टेशन अंतर्गत सत्रापुर येथिल रहवाशी आकाश जांभुळकर याने लोकडाऊन मुडे गरिबीला कंटाळून घरी कुणी नसतांना फाट्याला दुपट्टा बांधून गळफास लावून आत्महत्या केली.
घरी लकवा ग्रस्त आजरी वडील आणि भाऊ राहत असतांना लॉकडाउन मुडे हालाकीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्याच बरोबर तो करीत असलेले वाल पैंटिंगचे काम ही बंद होते. वडिलांची देखरेख औषधीचा खर्च व घरची परिस्थिती पाहून मानसिक त्रास होत असतांना सत्रापुर येथील रहवाशी आकाश दुर्योधन जांभुळकर २९ वर्षीय युवकाने रविवार दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
घरचा दरवाजा बंद उघडत नसल्याचे पाहून भावाने खिडकीतू पाहिले असता मृतक अकाश दुपट्याने गळफास लावल्याचा स्थितीत दिसला माहिती मिडताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतक आकाशला पोस्टमॉर्टेम साठी उपजिल्हारुग्णालय कामठी येथे नेले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.